विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव कारने तिघांना चिरडले
भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिघांना चिरडले.त्यातील २ महिलांची प्रकृती गंभीर तर १ बालक जखमी झाले आहे.
भोपाळ : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिघांना चिरडले.त्यातील २ महिलांची प्रकृती गंभीर तर १ बालक जखमी झाले आहे.
विरुद्ध दिशेने येणारी कार रस्त्यावरून चालणाऱ्या दोन महिला आणि बालकाला धडक देऊन पुन्हा त्याच दिशने पसार झाली. यावेळी काही स्थानिकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण अपघात करुन चालकाने तिथून पोबारा केला.
हा सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने झालेला प्रकार समोर आला आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होत असून संतापाची लाट उसळली आहे.