नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजी कमांडोंपैकी बेपत्ता असलेला कमांडो सापडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनिया गांधी यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या १० जनपथ येथून बेपत्ता झालेल्या एसपीजी कमांडोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


दिल्लीतील टिळक मार्ग येथून पोलिसांनी एसपीजी कमांडो राकेश कुमार याला ताब्यात घेतलं आहे. राकेश कुमार नेमका कुठं होता यासंदर्भात पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत.


सोनिया गांधी यांच्याच सुरक्षा ताफ्यातील कमांडो बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी याची गंभीर दखल घेतली होती.


एसपीजी कमांडो राकेश कुमार हा सोनिया गांधींचं निवासस्थान असलेल्या १० जनपथ येथे सुरक्षेसाठी तैनात होता. राकेश कुमार एक सप्टेंबर रोजी आपल्या घरातून एसपीजी कमांडोंचे कपडे परिधान करुन ड्यूटीसाठी निघाला होता. १० जनपथवर राकेश पोहोचला आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला होता.