नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत खोली क्रमांक ६२ मध्ये तर देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपतीपदाच्या या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत. समाजवादी पक्षाने यूपीएच्या मीरा कुमार यांना समर्थन दिलं होतं पण सपाचे शिवपाल यादव कोविंद यांना समर्थन करत आहेत. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील मीरा कुमार यांनी समर्थन दिलं आहे. पण त्रिपुरामधले टीएमसीचे ६ आमदार कोविंद यांना मतदान करणार आहे. यामुळे या निवडणुकीत सपा आणि टीएमचीमध्ये फूट पडतांना दिसत आहे.


खासदार आणि केंद्रीय मंत्री रांगेत उभे राहून मतदान करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी देखील मतदान केलं. खासदारांसाठी हिरव्या रंगाचा तर आमदारांसाठी गुलाबी रंगाचं मतपत्र बनवण्यात आलं आहे.