SSC च्या MTS/CGL/JE/ स्टेनोग्राफर ग्रेड `C` आणि `D`परीक्षांच्या तारखा जाहीर; केंद्र सरकारची बंपर भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशनने जाहीर केलेल्या नोटीफिकेशन नुसार कंबाइंड ग्रॅजुएट लेवल (2) ची परीक्षा 15 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. तसेच ऑगस्टमध्ये होणारी मल्टी टास्किंग स्टाफची परीक्षा 5 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC)ने विविध परीक्षांसाठी अप्लाय करणाऱ्या लाखो उमेदवारांना खुशखबर दिली आहे. आयोगाने सप्टेंबर महिन्यात होणार्या परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. सरकारी नोकरी मिळवू इच्छिनाऱ्या उमेदवारांनी यासंबधीची सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे.
कंबाइंड ग्रॅजुएट लेवल (2) परीक्षा 15 ते 16 सप्टेंबर दरम्यान
मल्टीटास्किंग स्टाफ परीक्षा 5 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान,
जुनिअर इंजिनिअरची परीक्षा 26 ऑगस्टरोजी होणार आहे.
परीक्षांच्या सविस्तर माहितीसाठी
MTS/CGL/JE सोबतच स्टेनोग्राफर ग्रेड 'C' आणि 'D'च्या परीक्षा 21 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येतील. उमेदवार https://ssc.nic.in/CandidatePortal/CandidatePortal या लिंकवर क्लिक करू विविध पदांसाठी अप्लाय करू शकता