Staff Selection Bharti: पदवीधर उमेदवार ज्या भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात, ज्यासाठी तयारी करत असतात ती भरती जाहीर झाली आहे. स्टाफ सिलेक्शनकडून सीजीएल भरतीची घोषणा करण्यात आली असून यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध सरकारी आस्थापनांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळते. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) एकत्रित पदवीधर स्तर परीक्षा SSC CGL 2024 साठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यामध्ये वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील यामध्ये देण्यात आला आहे. या भरतीद्वारे अंदाजे 17 हजार 727 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 


वयोमर्यादा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसएससी सीजीएल भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पदानुसार 18-30 वर्षे, 20 ते 30 वर्षे, 18-32 वर्षे किंवा 18 ते 27 वर्षे आहे. वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख 1 ऑगस्ट 2024 असेल. राखीव श्रेणीतील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता देखील पोस्टानुसार बदलेल. नोटिफिकेशनमध्ये याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.


पदवीधरांना 'श्रीमंत' बनवणारी नोकरी, स्टाफ सिलेक्शनच्या नोकरीत किती मिळतो पगार? काय सुविधा?


अर्ज शुल्क 


स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL 2024 साठी अर्ज शुल्क 100 रुपये इतके आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD) आणि आरक्षणासाठी पात्र माजी सैनिक (ESM) यांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात आली आहे.


निवड प्रक्रिया


उमेदवारांची निवड द्विस्तरीय असे. सुरुवातीला संगणक-आधारित परीक्षा (CBE)  होईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाईल.  संगणक आधारित परीक्षेचे नियोजन आणि अभ्यासक्रम कसा असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित विभागांकडून दस्तऐवज पडताळणी केली जाईल, याची नोंद घ्या. 


या भरती परीक्षेतील किमान पात्रता गुण जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये अनारक्षितांसाठी 30 टक्के, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 25 टक्के आणि इतर सर्व श्रेणींसाठी 20 टक्के आहेत. 


अनारक्षितांसाठी कमाल टक्केवारी 20 टक्के, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 25 टक्के आणि इतर सर्व श्रेणींसाठी 30 टक्के आहे.


स्टाफ सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीशी संबंधित नोटिफिकेशन, अर्जाची लिंक देण्यात आली आहे. इच्छुका आणि पात्र उमेदवार आयोगाच्या वेबसाइटवरील लिंकवर क्लिक करुन अर्ज करु शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर नोंदणी करावी लागेल. नोंदणी  प्रक्रिया सुरु असून 24 जुलै नोंदणीची शेवटची तारीख आहे. बातमीखाली महत्वाच्या थेट लिंक देण्यात आल्या आहेत.


अर्जाची शेवटची तारीख


24 जूनपासून एसएससी सीजीएल 2024 भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारांना 24 जुलैपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. तर 25 जुलैपर्यंत शुल्क भरता येणार आहे. कोणत्याही उमेदवाराला आपल्याअर्जामध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी 10 ते 11 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. टियर 1 परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाहीर होईल. तर टियर 2 परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक डिसेंबर 2024 मध्ये जाहीर होईल. 


पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा