पदवीधरांना 'श्रीमंत' बनवणारी नोकरी, स्टाफ सिलेक्शनच्या नोकरीत किती मिळतो पगार? काय सुविधा?

एसएससी सीजीएल नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर प्रसिद्ध होणार आहे. भरतीशी संबंधित सर्व तपशील नोटिफिकेशनमध्ये असून अर्ज सुरू होण्याची आणि शेवटची तारीख याचीही माहिती देण्यात येईल.

| Jun 24, 2024, 18:43 PM IST

Staff Selection Job Salary: एसएससी सीजीएल नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर प्रसिद्ध होणार आहे. भरतीशी संबंधित सर्व तपशील नोटिफिकेशनमध्ये असून अर्ज सुरू होण्याची आणि शेवटची तारीख याचीही माहिती देण्यात येईल.

1/9

पदवीधरांना 'श्रीमंत' बनवणारी नोकरी, जाणून घ्या SSC CGL मध्ये किती पगार? काय सुविधा?

Staff Selection Bharti SSC CGL Job Salary Marathi News

SSC CGL Job Salary: कर्मचारी निवड आयोग (SSC) यावर्षी एसएससी सीजीएल भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करणार आहे.  SSC CGL 2024 नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू होईल. 

2/9

मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये नियुक्ती

Staff Selection Bharti SSC CGL Job Salary Marathi News

दरवर्षी लाखो उमेदवार SSC CGL परीक्षेला बसतात. कारण या परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांची भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये नियुक्ती केली जाते. 

3/9

अनेक प्रकारच्या सुविधा

Staff Selection Bharti SSC CGL Job Salary Marathi News

या पदांवर चांगल्या पगारासह अनेक प्रकारच्या सुविधाही उपलब्ध आहेत. एसएससी सीजीएल पोस्टवर नियुक्ती झालेल्या उमेदवारांना काय फायदे मिळतात? याबद्दल जाणून घेऊया. 

4/9

अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन

Staff Selection Bharti SSC CGL Job Salary Marathi News

SSC CGL नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर प्रसिद्ध होणार आहे. भरतीशी संबंधित सर्व तपशील नोटिफिकेशनमध्ये असून अर्ज सुरू होण्याची आणि शेवटची तारीख याचीही माहिती देण्यात येईल.

5/9

अधिकारी स्तरावरील नोकऱ्या

Staff Selection Bharti SSC CGL Job Salary Marathi News

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर उमेदवार SSC CGL 2024 साठी अर्ज करू शकतात. भरती परीक्षेत निवड झाल्यानंतर उमेदवारांना अधिकारी स्तरावरील नोकऱ्या मिळतात. 

6/9

रिक्त पदे

Staff Selection Bharti SSC CGL Job Salary Marathi News

यामध्ये सहाय्यक विभाग अधिकारी, निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, संशोधन सहाय्यक, कर सहाय्यक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक यासह इतर अनेक पदांचा समावेश आहे.

7/9

दीड लाखापर्यंत पगार

Staff Selection Bharti SSC CGL Job Salary Marathi News

SSC CGL SSC CGL रिक्त जागा 2024 द्वारे, उमेदवारांना गट A आणि गट B पदांवर नियुक्त केले जाते. निवड झालेल्या उमेदवारांचे  7व्या वेतन आयोगानुसार 25 हजार 500 ते 1 लाख 51 हजारपर्यंत पगार दिला जातो.

8/9

विविध सुविधा

Staff Selection Bharti SSC CGL Job Salary Marathi News

पगारासोबतच SSC CGL परीक्षेद्वारे निवडलेल्या पदांवरील उमेदवारांना घरभाडे, प्रवास, वैद्यकीय आणि विशेष सुरक्षा यांसारखे भत्ते देखील मिळतात. त्यामुळे त्यांचा पगार वाढतो.

9/9

तयारीला लागा

Staff Selection Bharti SSC CGL Job Salary Marathi News

जर SSC CGL 2024 साठी अर्ज या महिन्यात म्हणजेच जूनपासून सुरू झाले, तर त्याची टियर I परीक्षा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. भरतीमध्ये सहभागी व्हायचे असले त्यांनी तयारी करायला सुरुवात करावी.