Startup मधून पुढच्या 2 वर्षात 12 लाखाहून अधिक रोजगार मिळणार; आतापर्यंत किती मिळाले? आकडेवारी हैराण करणारी
Startup India: स्टार्टअप आणि त्यामुळे मिळालेल्या रोजगाराची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
Startup India: देशामध्ये सध्या स्टार्टअपचे वारे वाहू लागले आहेत. तरुण पिढी स्टार्टबद्दल चर्चा करतेय. एकत्र मिळून काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली जातेय. सोशल मीडियात यावर अनेक प्रेरणादायी व्हिडीओ पाहायला मिळतात. असे असले तरी स्टार्ट अप प्रत्यक्षात आणणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. हे सर्व पाहता देशभरात स्टार्टअप उभारलेल्यांची संख्या फारशी नसेल असे तुम्हालादेखील वाटत असेल तर थोडं थांबा.कारण स्टार्टअप आणि त्यामुळे मिळालेल्या रोजगाराची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रम
देशामध्ये ओळख मिळवलेल्या स्टार्टअपने मिळून आतापर्यंत 15.5 लाखहून अधिक प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. सरकारकडून गेल्या दशकामध्ये स्टार्टअप कल्चर वाढविण्यासाठी अनेक पाऊले उचलण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटलंय. कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) (एमएसडीई) ने लोकसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटरनल ट्रे म्हणजेच डीपीआयआयटीच्या माध्यमातून आतापर्यंत 1 लाख 40 हजार 803 स्टार्टअप सुरु झाले आहेत.केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम विभागाने पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रम लागू केला आहे. याअंतर्गत उद्योगपतींना नव्या उद्योगांसाठी गैर-कृषि क्षेत्रामध्ये सेटअप करण्यास मदत झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
नोकरीसोबत हे शॉर्ट टर्म कोर्स केलात तर कराल डबल कमाई! प्रमोशनची दारंही उघडतील
25 हजार 500 कोटींची सब्सिडी
पारंपारिक कारागिर आणि शहरी तसेच ग्रामीण बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन येणे हा या सरकारी योजनांचा उद्देश आहे. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 9.69 लाख सूक्ष्म उद्योगांना 25 हजार 500 कोटी रुपयांची सब्सिडी दिली गेल्याची माहिती देण्यात आली. तसेच या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपण 79 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचेही सांगण्यात आले.
सरकारने हटवला एंजल टॅक्स
मंत्रालयाकडून 2024-25 आणि 2025-26 या पुढच्या 2 आर्थिक वर्षात 1.6 लाख नव्या एंटरप्राइज उभारण्याच्या योजना बनवण्यात आल्या आहेत. यामध्ये 12.8 लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात एंजल टॅक्स हटवण्याची घोषणा केली होती. यामुळे स्टार्टअपमध्ये विदेशातील फंडींग वाढू शकणार आहे.