State Bank of India FD Scheme: स्टेट बँक ऑफ इंडियात तुमचेदेखील खाते आहे का? तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एसबीआयकडून अनेक योजना जाहीर केल्या जातात. यात ग्राहकांना पैसे गुंतवल्यास त्यांना अधिक व्याज मिळते. एप्रिल महिन्यात एसबीआयने अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash FD Yojna) आणली होती. या योजनेत पैसे गुंतवल्यास एफडीच्या तुलनेत अधिक व्याज मिळत होते. मात्र, आता या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास तुमच्याकडे फक्त १ दिवस उरला आहे. (SBI FD)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश फिक्स डिपॉजिट योजना 15 ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी  संपणार आहे. ग्राहकांना उद्यानंतर या योजनेचा फायदा घेता येणार नाहीये. कारण 15 ऑगस्टनंतर बँकेकडून ही योजना बंद करण्यात येणार आहे. 


स्टेट बँकची ही एफडी योजना 400 दिवसांसाठी होती. या स्कीमअंतर्गंत तुम्ही 400 दिवस गुंतवणूक करु शकता. त्याचबरोबर दरमहिना, तिमाही, सहा महिने अशा प्रकारे पैसे गुंतवल्यास अधिक व्याज मिळणार आहे. एफडीचा कालावधी संपल्यानंतर व्याजेची रक्कम टीडीएस कापून तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे. 


गुंतवणूकदार 400 दिवसांच्या कालावधीसाठी SBI अमृत कलश ठेव योजनेत 2 कोटींपेक्षा कमी गुंतवणूक करू शकतात. याशिवाय व्याजाच्या बाबतीत सामान्य गुंतवणूकदारांना ७.१० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६ टक्के दराने व्याज मिळेल.


या योजनेत कोणत्याही गुंतवणूकदाराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 8017 रुपये व्याज मिळतील. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीत व्याज म्हणून 8600 रुपये मिळतील. 


काय आहे या योजनेचे वैशिष्ट्य


>> अमृत कलश योजनेत कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.
>> या योजनेत तुम्ही मुदतपूर्व पैसे काढू शकता.
>> गुंतवणूकदार अमृत कलश एफडीमध्ये दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
>> योनो बँकिंग अॅपद्वारेही तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.
>> याशिवाय शाखेत जाऊनही तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता.


एसबीआयमध्ये खाते कसे सुरू कराल?


SBI अमृत कलश योजना SBI अमृत कलश योजनेअंतर्गत, 19 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक त्यांचे खाते उघडू शकतात. खाते सुरू करण्यासाठी आधार कार्ड, ओळखीचा पुरावा, वयाचा ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, वैध मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा जवळच्या SBI शाखेला भेट देऊन खाते सुरू करु शकता. शाखेत पोहोचल्यानंतर तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. यानंतर, मागितलेल्या सर्व कागदपत्रांची एक प्रत जोडावी लागेल आणि नंतर काही पैशांची प्रारंभिक गुंतवणूक करून बँकेत जमा करावी लागेल.