मुंबई : एसबीआयच्या (SBI) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. एसबीआय 1 जुलैपासून काही नियमांमध्ये बदल करत आहे. या नव्या नियमांनुसार एटीएममधून पैसे काढणे (ATM Cash Withdrawal) आणि चेकबुक (Cheque Book) या सेवा महागणार आहेत. एसबीआयने एटीएम आणि बॅंकेतून पैसे काढण्याच्या सेवांच्या शुल्कात बदल केले आहेत. एसबीआयच्या वेबसाईटनुसार, सेवा शुल्क नव्या चेकबुक तसेच अन्य नॉनफायनान्स सेवांवर आकारण्यात येणार आहे. या नियमांची अंमलबजावणी 1 जुलैपासून  (BSBD) म्हणजेच बचत खातेधारकांनाही लागू होणार आहे. (state bank of india changes rule on cash withdrawal and cheque book from 1 july 2021)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआय बचत खातेधारकांना एका आर्थिक वर्षासाठी 10 पानी चेकबूक देते. आता या 10 पानी चेकबूकसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. यासाठी खातेधारकांना 40 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच यावर जीएसटीही आकारण्यात येणार आहे. तसेच 25 पानी चेकबूकसाठी खातेधारकाला 75 रुपये आणि जीएसटी द्यावी लागणार आहे. मात्र हे नवे नियम वरिष्ठ नागरिकांना नसणार आहेत.  


बचत खातेधारकांना महिन्यातून 4 वेळा व्यवहार करण्याची मुभा आहे. यामध्ये बँक आणि एटीएम व्यवहाराचा समावेश आहे. मात्र यानंतर खातेधारकाला प्रत्येक व्यवहारासाठी 15 रुपये अधिक जीएसटी आकारण्यात येते.  


कोरोनामुळे एसबीआयने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. बचत खातेधारक दुसऱ्या बँकेतून 25 हजार रुपये काढू शकतात. तर चेकद्वारे ही मर्यादा 1 लाखापर्यंत वाढण्यात आली आहे. तर त्रयस्थ व्यक्ती (ज्याच्या नावाने चेक दिला आहे) 50 हजार रुपये काढू शकेल.   


संबंधित बातम्या : 


HDFC Bankच्या शेअर होल्डर्सला बंपर डिव्हिडंड! कोरोना काळात शेअर होल्डर्सची चांदी


फक्त 55 रुपयांची गुंतवणूक आणि दरवर्षी मिळणार 36 हजार, जाणून घ्या योजनेबद्दल