जबरदस्त! आता एका कॉलवर घरपोच मिळणार 20 हजार रुपये, या बँकेची सुविधा
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला मोबाईल नंबर बँक अकाऊंटसह लिंक करणं बंधनकारक असणार आहे.
मुंबई : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. खातेधारकांना प्रत्येक लहान कामासाठी बँकेत जाण्याची गरज नाही पडणार. एसबीआयने या सेवेचं नामकरण डोअर स्टेप बँकिंग (Door Step Banking) असं केलं आहे. याबाबतच्या काही अटी आणि शर्थीही आहेत. याबाबत आपण जाणून घेऊयात. (state bank of india Door Step Banking service know about everything)
नोंदणी आवश्यक
एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी होम ब्रांचमध्ये (ज्या शाखेत खातं आहे) तिथे नोंदणी करावी लागेल. या नोंदणीसाठी अवघे काही मिनिटं लागतात. नोंदणी झाल्यानंतर बँकेसंदर्भातील प्रत्येक लहान काम घरबसल्या करता येणार आहे. खातेधारक घरबसल्या 20 हजार रुपये काढू शकतात. म्हणजेच एकाच कॉलवर बँकेच्या सुविधांचा लाभ घेता येईल. यामध्ये खातेधारकाला चेकबूक, लाईफ सर्टिफिकेट आणि डिमांड ड्राफ्ट यासारख्या सुविधांचा लाभ घेता येईल.
या आहेत अटी
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला मोबाईल नंबर बँक अकाऊंटसह लिंक करणं बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे एकापेक्षा अधिक खाते असले तरीही या सुविधेचा लाभ घेता येईल.
एसबीआयची ही सुविधा फक्त दृष्टीहीन व्यक्तींसह 70 वर्षांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांसाठीच आहे. मात्र या वर्गालाही केवायएसीची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी लागेल. त्यानंतरच या सुविधेचा लाभ घेता येईल.
होम ब्रांचपासून 5 किमीच्या अंतरात नोंदणीकृत पत्त्यावर राहणाऱ्या खातेधारकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खातेधारक किंवा इच्छूक 1800-1037-188 आणि 1800-1213-721 या क्रमांकावर संपर्क करु शकतात. तसेच https://bank.sbi/dsb या लिंकद्वारे अधिक माहिती घेऊ शकतात.