मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थित सुधारणा होत आहे. देशातील अर्थव्यवस्थेत 20.10 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. यामुळे रोजगार निर्मितीला फायदा मिळू शकतो. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट  बँक ऑफ इंडियाच्या अर्थ तज्ज्ञांनी एक रिपोर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये वित्तीय वर्ष 2022 मध्ये 50 लाख लोकांना रोजगार मिळण्याची आशा  आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SBIच्या अर्थतज्ज्ञांच्या मते 2021-2022 मध्ये श्रम बाजारातील व्यवहारांमध्ये सुधार होईल. महामारी नंतर कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करतील.  अर्थतज्ज्ञ सौम्य कांति घोष यांनी एका नोटमध्ये म्हटले आहे की, आमचा अंदाज आहे की,  चालू वर्षात लेबर मार्केटमध्ये व्यवहार चांगले राहतील. त्यामुळे कंपन्या भरती प्रक्रियेवर लक्ष देतील.


सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE)च्यामते. ऑगस्ट महिन्यात 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामध्ये 13 लाख नोकऱ्या ग्रामीण क्षेत्रातील आहेत. रोजगाराबाबत ही बाब अशा वेळी समोर आली आहे, ज्यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक लोक बेरोजगार आहेत.  त्यामुळे हा रिपोर्ट आशादायी मानला जात आहे.


रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जून तिमाही मध्ये 16 लाख लोकांना नवीन रोजगार मिळाला आहे.  जर नवीन रोजगारात वाढ झाली तर हा 2021-22 मध्ये हा आकडा 50 लाख पार करू शकतो.