शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये ७ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यामध्ये कोणता राजकिय पक्ष बाजी मारणार या चर्चेपेक्षा एका मतदाराची जास्त चर्चा आहे. कारण हे मतदार देशाचे पहिले मतदार म्हणून ओळखले जातात. वयाच्या शंभरीत पोहोचूनही मतदानाचा उत्साह कायम असल्याने यांचे देशभरातून कौतूक होत आहे. श्याम शरण नेगी असे या मतदाराचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किन्नोरमध्ये २५ ऑक्टोबर १९५१ ला पहिले मतदान पार पडले होते. यावेळी नेगी यांनी पहिल्यांदा मतदान केले होते. आता वयाच्या शंभरीत चालणे-फिरणे कठीण झाले असतानाही ते मतदान करण्यास उतरणार आहे. 


निवडणूक आयोगाने नेगी यांची चोख व्यवस्था ठेवण्याचे नियोजन केले आहे. किन्नोर येथील नेगी यांच्या घरापासून ते जवळच्या मतदान केंद्रापर्यंत विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या गाडीतून प्रवास करुन श्याम शरण नेगी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 


किन्नोर हा अतिशय दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी मतदानाबद्दल जनजागृती नव्हती. नेगी यांनी यासाठी खूप प्रयत्न करत महिनाभर हा परीसर पिंजून काढला. नेगी यांच्या या योगदानाबद्दल त्यांना अनेकदा गौरवण्यात आले आहे.


२०१४मध्ये झालेल्या निवडणुकीच्यावेळी नेगींचा एक व्हिडिओ बनवण्यात आला होता.


या व्हिडिओनंतरही नेगी हे देशभरात ओळखले जाऊ लागले. पर्यटनासाठी जाणारी माणसे नेगींना भेटून विचारपूस करतात. या व्हिडिओमध्ये नेगी यांनी त्यांच्या पहिल्या मतदानाची गोष्ट सांगितली होती.