नवी दिल्ली : आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य असणारी ओळख आहे. मात्र तुम्ही तुमचं आधार कार्ड लॅमिनेशन केलं असेल किंवा प्लास्टिक कोटिंग लावलं असेल तर त्या आधार कार्डला काहीच अर्थ उरणार नाही. ते आधार कार्ड बिनकामाचं ठरणार असल्याचं युआयडीएआयने स्पष्ट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॅमिनेशन केल्याने किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधार कार्डचा क्यू आर काम करणं बंद होऊ शकतं. त्यामुळे खासगी माहिती चोरली जाऊ शकते अशी शक्यता युआयडीएआयने वर्तवलीय. युआयडीएआयने आधार कार्डच्या चुकीच्या प्रकारे होणा-या वापराबाबत चिंता व्यक्त केलीय.


स्मार्ट किंवा प्लास्टिक आधार कार्ड अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. तसंच अनधिकृत व्यक्तीला आधार कार्ड नंबर देऊ नका, असं आवाहन युआयडीएआयने केलं आहे. अनधिकृत पद्धतीनं आधार कार्डची माहिती घेणं किंवा ते छापणं दंडनीय अपराध आहे. असं केलं तर कायदेशीर कारवाई होईल आणि दोषींना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशारा युआयडीएआयने दिला आहे.