Cyber Crime Today: अनेक तरुण तरुणींना मोबाईल गेम्सचा नाद लावून त्यांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार देशात उघड झाला आहे. या गेम मध्ये हरलेल्या हिंदू तरुण तरुणींना कलमा वाचायला सांगून इस्लाम काबुल करण्यास भाग पाडले जात आहे. या धर्मांतराच्या गेममुळे देशात खळबळ उडाली आहे. त्यातच आता ब्रा आणि पँटी बनवणाऱ्या कंपन्यामधून हिंदू महिलांचा डेडा चोरी करुन तो मुस्लिम देशांमध्ये विकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील एका कंपनीत हा प्रकार सुरु होता. 


काय आहे नेमका प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय सोनी असे हिंदू महिलांचा डेटा चोरणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे, राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (SOG) याबाबतची माहिती दिली आहे. संजय याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने कंपनीतून हा डेटा चोरला होता. संजय याने फक्त राजस्थानच नाही तर संपूर्ण देशातील मुलींचा डेटा चोरी केला आहे.


डेटा चोरी करणाराच आहे तक्रारदार


या डेटा चोरी प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे डेटा चोरी करणार संजय सोनी हाच तक्रारदार आहे. संजय सोनी याने  राजस्थान पोलिसांकडे या डेटा चोरी बाबत तक्रार दाखल केली. संजय सोनी हा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणायचा. राजस्थान एसओजीच्या म्हणण्यानुसार संजय सोनी एका टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून हॅकर्सशी कनेक्टेड होता. लीक झालेला डेटा ते एकमेकांशी  शेअर करायचे. 


अशी झाली डेटा चोरीची पोलखोल


संजय सोनी याने चोरी केलेला डेटा महिलांच्या नावासह सोशल मिडियावर शेअर केला.  40 लाख महिलांचा डेटा विकल्याचा दावा त्याने केला.  यानंतर त्यानेच या डेटा चोरीची तक्रार केली. आरोपी संजय सोनी याने कंपनीला ब्लॅकमेल करण्यासाठी मेल पाठवला होता. त्याच्याकडून 1500 डॉलर्सची रक्कमही जप्त करण्यात आली होती. ही रक्कम दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा करण्यात आली. विशेष म्हणजे ही रक्कम क्रिप्टो करन्सीमध्ये मागितली होती. पैसे उकळूनही आरोपी कंपनीला ब्लॅकमेल करत होता. संजय हा पदवीधर असल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. 3 वर्षे त्यांनी आखाती देशांमध्ये काम केले. त्याच्यावर चार गुन्हेही दाखल आहेत. या डेटामध्ये महिलांचे नाव, पत्ता, फोननंबर त्यांचे इमेल आयडी तसेच अंडरवेयरचे साईज आणि त्यांची इतरही माहिती होती.