छप्परफाड कमाई | फक्त 10 हजाराचे झाले 10 लाख; या 5 शेअर्समध्ये गुंतवणारे मालामाल
शेअर बाजारात अनेक जण श्रीमंत होण्याच्या आशेने पैसा गुंतवत असतात. त्यांचा विचार हा असतो की, कमी वेळात दमदार कमाई करावी. बाजारात असे काही शेअर आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांची ही इच्छा पूर्ण केली आहे.
मुंबई : शेअर बाजारात अनेक जण श्रीमंत होण्याच्या आशेने पैसा गुंतवत असतात. त्यांचा विचार हा असतो की, कमी वेळात दमदार कमाई करावी. बाजारात असे काही शेअर आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांची ही इच्छा पूर्ण केली आहे. गेल्या 10 वर्षात 120 ते 150 पट गुंतवणूक वाढली आहे. अद्यापही या शेअर्समधील तेजीची घौडदौड थांबलेले नाही. जाणून घ्या ते 5 शेअर्स...
Balaji Amines
या शेअरने 10 वर्षात गुंतवणूकदारांचा पैसा 150 पट वाढवला आहे. या दरम्यान, शेअर 35 रुपयांवरून 5223 रुपयांवर पोहचला आहे. 10 हजार रुपयांची गुंतवणूक 10 वर्षात 15 लाख रुपये झाली आहे.
Deepak Nitrite
हा शेअर 1 वर्षाच्या उच्चांकीवर आहे. 2456 रुपयांवर ट्रेड करीत आहे. हा 10 वर्षांचा टॉप गेनर आहे. या दरम्यान गुंतवणूकदारांचा पैसा 145 पट वाढला आहे. 10 वर्षात शेअरचा भाव 17 रुपयांवरून 2456 रुपये झाला आहे. 10 हजार रुपयांची गुंतवणूक 10 वर्षात 14 लाख 50 हजार इतकी झाली आहे.
Westlife Develop
या शेअरने 10 वर्षात 135 टक्के रिटर्न दिला आहे. या दरम्यान शेअरचा भाव 4 रुपयांवरून 536 रुपयांवर गेला आहे. शेअरमध्ये 10 हजार रुपयांची 10 वर्षापूर्वीची गुंतवणूक आज 13 लाख 50 हजार इतकी झाली आहे.
Indo Count Inds
या शेअरने 10 वर्षात 134 पट रिटर्न दिला आहे. एकेकाळी या शेअरचा भाव 2 रुपये होता. आज शेअर 268 रुपयांवर ट्रेड करीत आहे. 10 वर्षापूर्वी या शेअर्समध्ये गुंतवलेल्या 10 हजार रुपयांचे आज 13 लाख 40 हजार झाले आहेत.
Bajaj Finance
या शेअर्सने देखील गेल्या 10 वर्षात साधारण 120 पट रिटर्न दिला आहे. फक्त 65 रुपयांचा हा शेअर आज 7395 रुपये इतका झाला आहे. 10 वर्षापूर्वी शेअरमध्ये गुंतवलेल्या 10 हजार रुपयांचे 12 लाख रुपये झाले आहेत.