Share Market | या आठवड्यातही शेअर बाजारात घसरणीची शक्यता
Share Market Live market | गेल्या आठवड्यात बाजारात सलग घसरण नोंदवण्यात आली. अर्थसंकल्पापर्यंत ही घसरण होत राहील किंवा बाजार अस्थिर राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : जगभरातील शेअर बाजारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण, परकीय वित्त संस्थांकडून सुरू असलेला विक्रीचा सपाटा, वाढलेल्या तेलाच्या किमती, त्यामुळे गेल्या चार आठवड्यांपासून तेजीत असलेल्या भारतीय शेअर बाजारांना ब्रेक लागला. अन् गेल्या आठवड्यात बाजारात सलग घसरण नोंदवण्यात आली. अर्थसंकल्पापर्यंत ही घसरण होत राहील किंवा बाजार अस्थिर राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात भारतीय बाजारातून FIIने गुंतवणूक काढून घेतल्याने निर्देशांकात घसरण दिसून आली. त्याचवेळी DII ने काहीशी खरेदीही केली. एकूणच अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी विक्री सुरू ठेवल्याने बाजारात घसरण नोंदवण्यात आली.
येत्या आठवड्यात अनेक कंपन्यांचे येणारे तिमाही निकाल, परकीय संस्थांकडून केली जाणारी खरेदी विक्रीमुळे बाजाराची दिशा ठरणार आहे. त्यामुळे बाजाराच्या अस्तिरतेमुळे गुंतवणूकदार सावध पवित्र्यात आहेत.