Stock Market | या आठवड्यात बाजाराची कशी असेल चाल? या कंपन्यांचे निकाल, मान्सूनच्या स्थितीवर असेल गुंतवणूकदारांची नजर
आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिस आणि विप्रोच्या तिमाही रिझल्ट, आर्थिक वृद्धीचे आकडे, जागतिक आर्थिक संकेत इत्यादी घटनांचा परिणाम शेअर मार्केटवर दिसणार आहे.
मुंबई : आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिस आणि विप्रोच्या तिमाही रिझल्ट, आर्थिक वृद्धीचे आकडे, जागतिक आर्थिक संकेत इत्यादी घटनांचा परिणाम शेअर मार्केटवर दिसणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, या आठवड्यात इन्फोसिस आणि विप्रो यांच्यासह माइंड ट्री, टाटा एलेक्सी, आणि एचडीएफसी एएमसीच्या तिमाही निकालांची घोषणा होणार आहे. त्याशिवाय आटवड्याच्या दरम्यान, औद्योगिक उत्पादन, रिटेल आणि होलसेल मुद्रास्फितीचे आकडे देखील येणार आहेत.
कोरोनाच्या संसर्गावरही असणार नजर
येत्या आठवड्यात बाजाराची चाल निकाल, IIP, CPI आणि WPI च्या आकड्यांवर अवलंबून असणार आहे. त्याशिवाय मान्सूनची स्थिती, कोविड 19 च्या नव्या वेरिएंटशी संबधीत स्थिती आदी बातम्यांवर गुंतवणूकदारांची नजर असणार आहे.
अनेक कंपन्यांचे तिमाही निकालांच्याशिवाय अनेक मुद्द्यांवर बाजाराची चाल अवलंबून असणार आहे. जसे की, कच्च्या तेलाच्या किंमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा चढ उतार, परकीय गंगाजळी इत्यादी वृत्तांवर गुंतवणूकदारांची नजर असणार आहे.