Stock Market Live: नवीन वर्षात ट्रेडिंगची सुरूवात करण्यापूर्वी वाचा महत्वाचे फॅक्टर्स
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसून येत आहेत.
मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसून येत आहेत. आजच्या ट्रेंडिंगमध्ये प्रमुख आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहेत. त्यानंतर 2021 च्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी, यूएस बाजारात घसरण नोंदवण्यात आली.
शुक्रवारी अमेरिकेच्या डाऊ जोन्समध्ये 60 अंकांची घसरण दिसून आली आणि मार्केट 36,338.30 च्या पातळीवर बंद झाले. Nasdaq 97 अंकांनी घसरले. दुसरीकडे, S&P 500 निर्देशांक 13 अंकांनी घसरले आणि 4,766.18 वर बंद झाले.
ओमिक्रॉन विषाणूचा वाढता संसर्ग जागतिक बाजारांवर परिणाम करीत असल्याचे दिसून येत आहे. 2021 या वर्षात S&P 500 26.89% वाढले आहे, Dow 18.73% आणि Nasdaq 21.39 नी वधारले आहे. आशियाई बाजारात आज SGX Nifty आणि हँग सेंग घसरणीसह व्यवहार करीत आहेत.
FII आणि DII
शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) बाजारात 575.39 कोटींची गुंतवणूक केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) देखील शुक्रवारी बाजारात 1165.62 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
ऑटो क्षेत्र
मारुती, टाटा मोटर्स आणि आयशर मोटर्सची डिसेंबरमधील व्यवहार अपेक्षेपेक्षा चांगले राहिले आहेत. पण हिरो मोटो आणि टीव्हीएस मोटरने अपेक्षेपेक्षा कमी वाहनांची विक्री केली आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये ऑटो क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.
आजच्या व्यवहारातील महत्वाचे फॅक्टर
मार्केट एक्सपर्ट अजित मिश्रा म्हणतात की, या आठवड्यात अनेक हाय फ्रिक्वेंसी डाटावर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. तसेच कोविड 19च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजाराची चाल लक्षात घेणे महत्वाचे ठरेल. तिसऱ्या लाटेमुळे काही राज्यात प्रतिबंध लावणे सुरू झाले आहे.
आशियाई बाजारात संमिश्र कल
आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. SGX निफ्टी आणि हँग सेंग घसरणीसह व्यवहार करत आहेत. तैवान वेटेडमध्ये काहीशी तेजी नोंदवण्यात आली आहे.