Share Market Update Today: भारतीय शेअर बाजाराच्या कामकाजाचा आज आठवड्यातील शेवटचा दिवस आहे. आज सकाळी बाजार हिरव्या निशाण्यावर उघडला आणि दिवसभराच्या व्यवहारानंतर तो त्याच रंगावर बंद झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेन्सेक्स आणि निफ्टी लाल निशाण्यावर बंद झाले. आजचा व्यवहार संपल्यानंतर मुंबई शेअर मार्केटमध्ये (Share Market) मध्ये सेन्सेक्स (Sensex) सुमारे 59.15 अंक म्हणजेच 0.10% च्या वाढीसह 58,833.87 वर बंद झाला तर निफ्टी (Nifty) केवळ 36.45 अंकांच्या किंवा 0.21% च्या वाढीसह 17,558.90 वर बंद झाला. 


अमेरिकी बाजारातील मजबूत तेजीच्या परिणामानंतर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार हिरव्या चिन्हांसह उघडला. व्यापार सत्राच्या सुरुवातीला 30 अंकांचा सेन्सेक्स 275.95 अंकांनी वाढून 59,050.67 वर उघडला. त्याच वेळी 50 अंकांचा निफ्टी 91 अंकांच्या वाढीसह 17,619.30 वर उघडला. व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर हिरव्या चिन्हांसह व्यवहार करताना दिसले. टायटनच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. 


जागतिक बाजार स्थिती काय आहे? - अमेरिकन बाजाराने तेजीची नोंद केली आहे. डाऊ जोन्स 323 अंकांनी वधारला आणि नॅस्डॅकमध्ये 208 अंकांची मजबूती दिसून आली. ब्रेंट क्रूड 100 डॉलरच्या खाली आला आहे. 


येत्या सोमवारपासून शेअर मार्केट गुंतवणूकदारांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचं राहिलं. 


(Disclamier: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी शेअर मार्केट सल्लागारांचा सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)