मुंबई : सप्टेंबर तिमाही निकालानंतर गुंतवणुकीसाठी अनेक शेअर्सचे मूल्यांकन वधारले आहे. या समभागांमध्ये चांगल्या व्यवसायिक दृष्टिकोनाच्या आधारे गुंतवणूकीच्या संधी निर्माण होत आहेत. 100 रुपयांखालील असाच एक स्टॉक म्हणजे इंजिनियर्स इंडिया होय. या स्टॉकमध्ये ब्रोकरेज हाऊसेस गुंतवणूक सल्ला देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रोकरेज ICICI सिक्युरिटीजने इंजिनियर्स इंडियामध्ये 109 रुपयांच्या लक्ष्यासह खरेदी कॉल दिला आहे. या स्टॉकची सध्याची किंमत 70 रुपयांच्या आसपास आहे.


56% परताव्याची अपेक्षा


18 नोव्हेंबर 2021 रोजी स्टॉकची किंमत 69.80 रुपये होती. ब्रोकरेज फर्मच्या ने दिलेल्या 109 रुपयांच्या लक्ष्य किंमतीच्या आधारावर, गुंतवणूकदारांना या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास सुमारे 56 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.


ब्रोकरेज अहवाल काय सांगतो?


ब्रोकरेज फर्म म्हणते की इंजिनियर्स इंडिया (EIL) ची Q2FY22 कामगिरी खराब आहे. तथापि, कंपनीला या तिमाहीत चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL), नागापट्टणम कडून दोन प्रमुख ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत.


सुमारे 1170 कोटी रुपयांची ही ऑर्डर आहे. त्यामुळे कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली आहे.


stock markets, buy call, engineers india share,, icici securities, 100 rupees, stock, high return,