200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा स्टॉक; तुफान परतावा मिळवण्याची संधी
Buy Jindal Stainless | ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआयने जिंदाल स्टेनलेसच्या शेअरसाठी नवीन लक्ष दिले आहे. यानुसार गुंतवणूकदारांना 28 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.
मुंबई : शेअर बाजारातून मागील एका वर्षात चांगला परतावा मिळाला आहे. काही शेअर्सच्या तेजीमुळे तर गुंतवणूकदार मालामाल झाले आहे. अनेक शेअर असे आहेत की, ते मल्टीबॅगर ठरले आहेत. असाच एक शेअर म्हणजेच जिंदाल स्टेनलेस (Jindal Stainless) होय. जिंदाल स्टेनलेसच्या शेअर्सने मागील एका वर्षात 225 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने या शेअर्समध्ये आणखी तेजीची शक्यता वर्तवली आहे. आयसीआयसीआय सेक्युरिटीजने शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने जिंदल स्टेनलेसमध्ये खरेदी करण्याचा सल्ला देत 250 रुपयांचे टार्गेट दिले आहेत.
Jindal Stainless : 28 टक्क्यांच्या पताव्याची अपेक्षा
ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सेक्युरिटीजने(ICICI Securities)ने जिंदाल स्टेनलेससाठी 250 रुपयांचे टार्गेट दिले आहे. 27 ऑक्टोबरला कंपनीच्या शेअरचा भाव 195 रुपयांवर बंद झाला. सध्याच्या भावावर गुंतवणूक केल्यास 28 टक्क्यांहू जास्त रिटर्न मिळू शकतो. एका वर्षात शेअरने जबरदस्त तेजी नोंदवली असून 60 रुपयांचा शेअर 1956 रुपयांवर पोहचला आहे.
ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, कंपनीचे उत्पन्न चांगले आहे. पहिल्या तिमाहीमध्ये ज्या ब्राऊनफिल्ड एक्सपेंशन प्रोजेक्ट्सची घोषणा करण्यात आली होती. ती आता कार्यान्वित आहे.
सप्टेंबर तिमाहीमध्ये 5 टक्क्यांनी वाढला नफा
स्टील सेक्टरमध्ये या कंपनीच्या 2021 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 412 कोटींचा नफा नोंदवला गेला आहे. कंपनीची वॅल्यूम ग्रोथदेखील चांगली आहे.