SBI चा शेअर देणार छप्परफाड कमाई; मिळू शकतो 30 टक्क्यांपर्यंत परतावा सविस्तर वाचा
शेअर बाजारात उतार-चढ होत असते. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अनेक शेअर्समध्ये तज्ज्ञांनी गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
सौरभ पांडे, झी मीडिया, मुंबई : शेअर बाजारात उतार-चढ होत असते. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अनेक शेअर्समध्ये तज्ज्ञांनी गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. असाच एक जबरदस्त फंडामेंटल असलेला शेअर म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) होय. सप्टेंबर तिमाहीच्या चांगल्या रिझल्टनंतर शेअरबाबत ब्रोकरेज हाऊस बुलिश आहेत. ब्रोकरेज हाऊसेसने एसबीआयच्या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
आयसीआयसीआय सेक्युरिटीज
आयसीआयसीआय सेक्युरिटीजने (Icici securities) एसबीआयमध्ये 624 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. शेअरची सध्याची किंमत 520 रुपयांच्या आसपास आहे. सध्याच्या किंमतीच्या हिशोबाने टार्गेट पूर्ण झाल्यास 20 टक्क्यांपर्यंतचा नफा मिळू शकतो. एसबीआयसाठी सप्टेंबरचे तिमाही निकाल शानदार राहिले आहेत. क्रेडिट क्वॉलिटी परफॉमन्स आणि मार्जिन चांगले झाले आहे. बँकेची क्रेडिट कास्ट आणि एआयएम प्रोफाइल उत्तम राहिली आहे. नेट अर्निंगमध्ये 67 टक्क्यांची ग्रोथ राहिली आहे.
मोतीलाल ओस्वाल
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओस्वालने (motilal oswal) एसबीआयच्या शेअरसाठी 675 रुपयांचे लक्ष दिले आहे. बँकेचा सप्टेंबर तिमाहीमध्ये नेट प्रॉफिट वर्षाला 67 टक्क्यांनी वाढून 7626 कोटी रुपये झाला आहे. बँकेचा ग्रॉस एनपीए दुसऱ्या तिमाहीमध्ये 5.32 टक्क्यांनी कमी होऊन 4.90 टक्क्यांवर गेला आहे.
SBI Share Price