मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे जेथे तुम्ही तुमच्या गुंतवणूकीवर उच्च परतावा मिळवू शकता.परंतु त्यासाठी तुम्हाला एक उत्तम शेअरची निवड करावी लागेल. मार्केट एक्स्पर्ट संदिप जैन यांनी तुमच्या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आज एक शानदार शेअरची निवड केली आहे. या शेअरमध्ये खरेदी करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदिप जैन यांनी Vidhi Specialty वर खरेदीचा सल्ला दिला आहे. कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. ही फुड सेक्टरमधील कंपनी आहे. कंपनीचे व्यवस्थापन चांगले आहे. तसेच कंपनीचे प्रोडक्ट 80 देशांमध्ये निर्यात होतात.


खरेदीचा सल्ला.
CMP - 346
Target - 390
अवधी- 6-9 महीने


कंपनीची रिटर्न ऑन इक्विटी 25 टक्के आहे. मागील 3 वर्षापासून नफ्याची CAGR 32 टक्के आहे. मागील वर्षापासून जून तिमाहीमध्ये कंपनीने 7 कोटींचा नफा सादर केला होता. जो वाढून यावर्षी 13 कोटी झाला आहे. कंपनीच्या प्रमोटर्सकडे 65 टक्के भागिदारी आहे.