मुंबई : Stock to Buy: शेअर बाजारात आजच्या दिवसाची सुरूवात मोठ्या तेजीत झाली. ग्लोबल मार्केटच्या चांगल्या संकेतामुळे शेअर बाजारात खरेदीदारांची पकड मजबूत झालेली दिसली.  फार्मा सेक्टर सोडलं तर इतर सर्व सेक्टरमध्ये जोरात खरेदी सुरु आहे. अशा परिस्थितीत नेमक्या कोणता स्टॉक विकत घ्यावा याबद्दल शेअर बाजार तज्ज्ञ संदिप जैन (Sandeep Jain) यांनी दिलेला महत्वाचा सल्ला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


संदिप जैन यांच्या मते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी Orient Bell Ltd हा शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सिरेमिक सेक्टरमधील ही एक चांगली कंपनी आहे. या कंपनीचे फंडामेंटल्स देखील उत्तम आहेत. या सेक्टरमध्ये ही कंपनीची कामगिरी चांगली आहे. मागच्या चार-पाच तिमाहीत कंपनीचा व्यवहार उंचावला आहे. या कंपनीची वेबसाइट देखील खुप टेकी आणि आकर्षक आहे.


Orient Bell


CMP- 675.55
Target- 750


कंपनीचे फंडामेंटल्स


Orient Bell कंपनीता फंडामेंटल्स मजबूत आहेत. कंपनीने कर्ज मोठ्या प्रमाणात कमी केलं आहे. कंपनी जवळ-जवळ आता कर्जमुक्त झाल्यात जमा आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये कंपनीचा प्रॉफिट हा साधारणत: 57-55 टक्क्यांनी वाढला असून तो कंपनीच्या प्रगतीसाठी फायदेशीर आहे. 


कजारिया, शेरा आणि ओरियएंट बेल टाइल्स प्रोडक्शन आणि निर्यात क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये FIIs आणि DIIs यांचीदेखील मोठी गुंतवणूक आहे. प्रमोटर्सची शेअरहोल्डिंग 65 टक्क्यांची आहे.


काय म्हणतोय कंपनीचा निकाल..?


जून तिमाहीत कंपनीचा नफा हा 57.65 टक्क्यांनी कमी होऊन 7 कोटी रुपये इतका झाला आहे. मार्च 2022 तिमाहीमध्ये कंपनीचा नफा 16.53 कोटी रुपये इतका होता. 


कॉस्ट आणि विक्री कमी झाल्याने कंपनीचा नफा कमी झालीये. मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी हा शेअरमध्ये 6-9 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.