माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरात लाखोंची चोरी
चिदंबरम यांच्या अडचणी संपेनात...
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी.चिदंबरम यांच्या घरात चोरी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. चिदंबरम आणि त्यांचं कुटुंब सध्या अडचणीत सापडलं आहे. एकीकडे चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणाला तोंड द्यावं लागतंय तर त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम एअरसेल-मॅक्सिस डीलमध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांचा सामना करत आहे.
कार्ती चिदंबरमवर आरोप आहे की, त्यांच्या कंपनीने INX मीडिया समूहाला परराष्ट्र गुंतवणुकीसाठी मंजूरी देण्यासाठी लाच घेतली होती. यूपीए सरकारच्या दरम्यान INX मीडियाला FIPB (फॉरन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड) कडून मान्यता मिळाली. या दरम्यान हा विभाग पी चिदंबरम यांच्याकडे होता.
पी. चिदंबरम यांच्या तामिळनाडू येथील घरात ही चोरी झाली आहे. हिरे, सोनं आणि १ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे.