चेन्नई : तुतीकोरीनमध्ये झालेल्या हिंसाचारातील एक दु:खद व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये एक व्यक्ती गोळीबारात जखमी झालेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसतोय... आणि त्याच्या चारही बाजुंनी पोलीस जवान उभे असलेले या व्हिडिओत दिसत आहेत. एक पोलीस कर्मचारी या व्यक्तीला काठीनं ढकलत ओरडतानाही दिसतोय... 'अॅक्टिंग बंद कर आणि इथून निघून जा'... पोलिसाचा आवाज हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे उभे करण्यासाठी पुरेसा आहे. तमिळनाडूच्या तुतीकोरीन भागात तांबा संयंत्रची निर्मितीचा विरोध केला जातोय... याचविरुद्ध नागरिक आंदोलन करत रस्त्यावर उतरलेत. २२ वर्षीय कलिअप्पनही या आंदोलनात सहभागी झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला... यामध्ये कलिअप्पन जखमी झाला होता... काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला... मात्र, कलिअप्पनच्या मृत्यूनंतर त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं वायरल होताना दिसतोय.  



हा व्हिडिओ एका स्थानिक पत्रकारानं रेकॉर्ड केला... यामध्ये जमीनवर जखमी अवस्थेत विव्हळणारा व्यक्ती 'अॅक्टिंग' करत असल्याचं पोलिसांना वाटतंय. 


कलिअप्पनला जखमी अवस्थेत तुतीकोरीनच्या हॉस्पीटलमध्ये आणण्यात आलं. इथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं...