भारत : भारतात रेल्वेचं जाळं पसरलं आहे. आपण रेल्वेने प्रवास करताना आपल्याला त्या प्रवासात अनेक वेगवेगळे स्टेशनंची नावं कळतात. काही जमेशीर असतात, तर काही एकदम आकर्षक. प्रत्येक रेल्वे स्टेशनची आपली अशी एक ओळख असते. दोन राज्यांचा सीमेवरील रेल्वे स्टेशन, महिलाराज असलेलं स्टेशन, असे अनेक रेल्वे स्टेशनबद्दल आपण ऐकून असतो. पण तुम्हाला भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशनचं नाव माहिती आहे का? नाही...मग चला आपण जाणून घेऊयात या रेल्वे स्टेनशबद्दल


हे आहे भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंहाबाद, हो सिंहाबाद हे भारतातील शेवटचं आणि इंग्रजांच्या काळातील रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनचं वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजांच्या काळात हे स्टेशन जसं होतं आजही ते त्याच रुपात आहे. सिंहाबाद हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमधील मलादा जिल्ह्यातील हबीबपूरमध्ये आहे. तर हे रेल्वे स्टेशन बांगलादेशच्या सीमला लागून आहे. या रेल्वे स्टेशनवर मालगाड्या ठेवल्या जात होत्या. त्यामुळे या स्टेशनवर लोकांची रहदारी कमी आहे. बांगलादेश या स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे.



भारत स्वातंत्र्य झाल्यावर देशाचं विभाजन झालं त्यावेळी या स्टेशनवर काम बंद होतं. आजही ते रेल्वे स्टेशन आपली ओळख जपत मदतीच्या आशेवर जगत आहे. 1978 साली या रेल्वे स्टेशनवर परत मालगाड्यांच्या सीटींचा आवाज घुमायला लागला. या गाड्या पहिले भारतातून बांगलादेशमध्ये ये-जा करत होत्या. नंतर 2011 मध्ये झालेल्या करारामध्ये यात नेपाळचाही सहभाग झाला.


स्टेशनचं रुप आजही इंग्रजांच्या काळातील


सिंहाबाद या रेल्वे स्टेशनने आपली इंग्रजांच्या काळातील ओळख आजही तशीच जपली आहे. इंग्रजांच्या काळात असलेले सिग्नलसुद्धा तसेच आहेत. मजेशीर म्हणजे कार्डबोर्डवाले तिकीटही आजही या स्टेशनवर मिळतात. गंमत म्हणजे इंग्रजांच्या काळातील टेलिफोन पण इथे पाहिला मिळतो.


 




काही क्षणासाठी हे स्टेशनवर आल्यावर इंग्रजांच्या काळात आपण वावर आहोत असं वाटतं. या स्टेशनवर मालगाड्यांशिवाय कुठलीही लांब पल्ल्यांची ट्रेन येत नाही. त्यामुळे या स्टेशनवरील तिकीट काउंटर बंद आहे. या स्टेशनवरुन मालगाड्या रोहनपूर मार्गे बांगलादेशला जातात.


हे स्टेशन प्रवाश्यांचा प्रतिक्षेत



मैत्री एक्स्प्रेस आणि मैत्री एक्स्प्रेस-1 या पॅसेंजर गाड्या या स्टेशनहून पुढे जातात. 2008 मध्ये मैत्री एक्स्प्रेस कोलकाता ते ढाका सुरु करण्यात आली. तर मैत्री एक्स्प्रेस-1 कोलकाताहून बांगलादेशच्या सुरुवातीच्या शहरात जाते. त्यामुळे हे स्टेनशवरुन प्रवासी ट्रेन सुरु करण्यात यावी, ही मागणी कायम करण्यात आली आहे. भारतातील शेवटचं स्टेशन अशी या स्टेशनची ख्याती असल्याने सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं.