मुंबई : देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी आयुष्यात आलेल्या संकटांचा सामना करत समाजात एक उच्च स्थान मिळवलं आहे. अशीचं एर नारीशक्ती म्हणजे केरळमधील महिला पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector) एनी शिवा (Anie Siva). एनी शिवा यांनी  जीवनात अनेक मोठ्या संकटांवर मोठ्या धैर्याने मात केली आहे. एनी शिवा यांनी कांजीरामकुलममधील केएनएम शासकीय महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेत होत्या. तेव्हा त्यांनी कुटुंबाविरूद्ध जावून लग्न केलं. पण लग्नानंतर त्यांची खरी परीक्षा सुरू झाली. 
 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाला जन्म दिल्यानंतर पतीने त्यांना सोडलं. पतीने सोडल्यामुळे त्या अवघ्या 6 महिन्यांच्या मुलाला घेवून माहेरी आल्या. तेव्हा त्यांच्या घरच्यांनी त्यांनी स्वीकारलं नाही. कुटुंबाने एनी शिवा आणि त्यांच्या 6 महिन्यांच्या मुलाला घरा बाहेर काढलं. घरा बाहेर काढल्यानंतर एनी शिवा त्यांच्या मुलासोबत आजीच्या घरीपाठी असलेल्या एक झोपडीत राहू लागल्या. 


स्वतःचं आणि मुलाचं पोट भरण्यासाठी त्यांनी काम करण्यास सुरूवात केली. कधी आयस्क्रिम विकली, तर कधी लिंबू पाणी... पण त्यांना यश मिळालं नाही. अशा कठीण समयी त्यांनी छोटी-मोठी काम केली आणि मुलांचा आणि स्वतःचा सांभाळ केला. कुटुंबाची साथ मिळाली नाही, समोर आलेली आर्थिक परिस्थिती... अशात त्यांनी शिक्षण मात्र सोडलं नाही. एनी शिवा यांनी समाजशास्त्र या विषयात पदवी मिळवली.



 


एनी शिवा यांनी 2014 साली तिरुवनंतपुरम येथे एका क्लासमध्ये एडमिशन घेतलं. एका मित्राच्या मदतीने सब इंस्पेक्टर (Sub Inspector) ची परीक्षा दिली. 2016 साली त्यांना यश मिळालं आणि त्या  सिव्हिल पोलिस अधिकारी बनल्या. तीन वर्षानंतर म्हणजेच  2019 मध्ये त्यांनी उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि जवळपास दीड वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी वर्कला पोलीस ठाण्यात प्रोबेशनरी सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.



एनी शिवा म्हणाल्या, 'मला माहिती झालं माझी पोस्टिंग वर्कला पोलीस स्थानकात झाली आहे. ज्या ठिकाणी माझ्या मुलाने अनेक संकटांचा सामना केला, रडलो पण तेव्हा आम्हाला कोणीही आधार दिला नाही. ' त्यांचं हे स्ट्रगल खरचं प्रेरणा देणारं आहे.