दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल होती. भूकंपाचं मुख्य केंद्र नेपाळ असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीही दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या चार दिवसांत तिसऱ्यांदा दिल्लीमधली जमीन भूकंपाने थरथरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीव्यतिरिक्त उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 4 वाजून 18 मिनिटांनी हा भूकंप आला.



 
याआधी शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल मोजण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजून 32 मिनिटांनी हे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाचं केंद्र नेपाळ होतं. 


भूकंप नेमका का येतो?


वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी टॅक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रवरूप लावा आहे आणि त्यावर टॅक्टोनिक प्लेट्स तरंगत आहेत. अनेक वेळा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे, काहीवेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जेव्हा जास्त दाब असतो तेव्हा या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून येणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. यामुळे डिस्टर्बंस होतो आणि भूकंप येतो. 


किती तीव्रतेचा भूकंप किती नुकसान करतो?


- 0 ते 1.9 रिश्टर स्केलचा भूकंप आल्यास फक्त सीज्मोग्राफवरुन समजू शकतो. 
- 2 ते 2.9 रिश्टर स्केलवर भूकंप होतो तेव्हा सौम्य हादरे येतात.
- 3 ते 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप आल्यास शेजारुन एखादा ट्रक गेल्यानंतर जसं वाटतं तसा अनुभवत येतो. 
- 4 ते 4.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यास खिडक्या तुटतात. भिंतींवर टांगलेल्या फ्रेम्स पडू शकतात.
- 5 ते 5.9 रिश्टर स्केलवर भूकंप झाल्यास फर्निचर हलू शकते.
- 6 ते 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यास इमारतींच्या पायाला तडे जाऊ शकतात. वरच्या मजल्यांचे नुकसान होऊ शकते