कर्नाटक : राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. मंदिर, मठ आणि मशिदींना सलग भेटी देत आहे. तिथे एका शाळेत विद्यार्थ्यांना संबोधित करताना एका विद्यार्थिनीने असे काही सांगितले की सर्वच हैराण झाले. या ठिकाणच्या भाषणात राहुल यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. देशात ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना ती मिळत नाहीए. पण नीरव मोदी भारतातून २२ हजार कोटी रुपये घेऊन पळाला. हा पैसा व्यवसाय करण्यासाठी महिलांना दिला असता तर विचार करा किती फायदा झाला असता ?


राहुल झाले निरूत्तर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी विद्यार्थीनीने राहुल यांना प्रश्न विचारला, मला एनसीसीचे सी सर्टिफिकेट मिळाले तर मला काय फायदा होईल ? पण राहुल यावर काही उत्तर देऊ शकले नाही. मला एनसीसीबद्दल जास्त माहित नाही. त्यामुळे ठिक उत्तर देऊ शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले.


सेल्फी  काढला 



'सर मला तुमच्यासोबत सेल्फी काढायचा आहे.' असे एक विद्यार्थीनीने म्हटले. याला राहुल यांनी लगेचच हसून उत्तर देत होकारार्थी मान दर्शविली. 


कर्नाटकात २२४ विधानसभा जागांसाठी निवडणुक होत आहे.  कॉंग्रेस आणि भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष इथल्या दौऱ्यावर आहेत.