Ghaziabad College Video : गाझियाबादमधील (Ghaziabad) एबीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील (ABES Engineering College) एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवादरम्यान 'जय श्री राम'ची (Jai Shri Ram) घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला एका प्राध्यापकाने स्टेज सोडण्यास सांगितल्याचा हा व्हिडीओ आहे. कॉलेजमध्ये आयोजित इंडक्शन कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याने मंचावरून जय श्री रामची घोषणा दिली. यानंतर महाविद्यालयीन प्राध्यापकाने विद्यार्थ्याला स्टेजवरून खाली उतरवं. मात्र आता विद्यार्थ्याला खाली उतरवल्यामुळे प्राध्यापिकेला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाझियाबादमधील महाविद्यालयाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा विद्यार्थ्याने स्टेजवरून 'जय श्री राम' म्हटले तेव्हा एका महिला प्राध्यापकाने त्याला स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितले. विद्यार्थ्याला शिक्षकीने बाहेर जाण्यास सांगितले आणि स्टेजवरून खाली उतरवले. त्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या दोन गटात गोंधळ उडाला होता. वाद एवढा वाढला की पोलिसांचा ताफाही घटनास्थळी पोहोचला. कसेबसे विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटांना शांत करण्यात आलं.  त्यानंतर हा कार्यक्रम  थांबवण्यात आला. दुसरीकडे हिंदू रक्षा दलाने या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा हिंदू रक्षा दलाने दिला. आता याप्रकरणी कॉलेजने कडक कारवाई केली आहे. महाविद्यालयाने महिला शिक्षिकेला निलंबित केले आहे. याशिवाय त्यामागचे कारणही सांगितलं आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये प्रेक्षकांमधील काही विद्यार्थ्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या आणि प्रत्युत्तर म्हणून मंचावर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याने माईक हातात घेतला आणि तीच घोषणादिली. काही वेळातच संपूर्ण सभागृह त्यात सामील झाले आणि  घोषणाबाजी करू लागले. यानंतर महिला प्राध्यापिकेने मंचावर असलेल्या विद्यार्थ्याला तेथून निघून जाण्यास सांगितले. महाविद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने अशा घोषणा देऊ नका, असे त्यांनी विद्यार्थ्याला सांगितले.



त्यानंतर आणखी एक प्राध्यापक आपल्या सहकाऱ्याच्या मदतीसाठी पुढे आला आणि त्याने विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यास सुरुवात केली. सांस्कृतिक महोत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करू नये, या प्राध्यपाकाने यावेळी सांगितले. 'आपण येथे काही सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आलो आहोत, मग 'जय श्री राम'च्या घोषणा का दिल्या जात आहेत. यामागे कोणताही तर्क नाही. शिस्तबद्ध राहिल्यासच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो,' असे या प्राध्यापकाने म्हटलं. मात्र हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर प्रचंड नाराजी दर्शवली आहे. या घटनेनंतर एबीईएस कॉलेजच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होता.


प्राध्यापकांवर कारवाई


महाविद्यालयाचे संचालक संजय कुमार सिंह यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की, 'काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता. तो व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्ही उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीला 24 तासांच्या आत शिफारशी देण्याच्या सूचना कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. समितीच्या शिफारशींच्या आधारे दोन प्राध्यापकांचे वर्तन अयोग्य असल्याचे आढळून आल्याने त्यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे.'