नवी दिल्ली : हिमाचलच्या सरकारी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी लायब्ररीमध्ये पायाभूत सुविधांच्या अभावाला शांततापूर्वक विरोध दर्शवला. विद्यार्थी लायब्ररीच्या बाहेर रस्त्यावर अभ्यासाला बसले. लायब्ररीत पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने त्यासाठी वारंवार मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही त्या पूर्ण न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांनी सांगितले की, लायब्ररीत बसण्यासाठी खुर्च्या नाहीत आणि शौचालयही नाही. याची वारंवार तक्रार करूनही सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. 


पहा फोटोज...




असुविधेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत. परिक्षेची तयारी करणे अवघड जात आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहेत. म्हणून याचा विरोध करण्यासाठी लायब्ररी ऐवजी विद्यार्थी लायब्ररीबाहेर रस्त्यावर अभ्यासाला बसले.


काय घेतला निर्णय?


विद्यार्थ्यांच्या या कृतीनंतर सरकारी अधिकारी तेथे पोहचला आणि त्यांनी या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यातील काही समस्यांवर लगेचच तोडगा काढण्यात आला. तर काहींसाठी आश्वासन देण्यात आले आहे.
हे प्रकरण वाढल्यावर शिक्षण सचिवांच्या आदेशांनंतर शिक्षक निर्देशक आणि एडीएम कांगड़ा घटनास्थळी पोहचले. यादरम्यान त्यांनी समस्या जाणून घेतल्या. 
त्यानंतर रविवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विद्यार्थी स्वतः सफाई करणार आहेत. तर शौचालयाची सफाई करण्याचे आणि ते बंद न ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर लायब्ररीचे मेंबर नसतानाही लायब्ररीत बसण्याची परवांगी देण्यात येईल. तसंच लायब्ररी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ओपन असेल. तर थंडीत सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंतची वेळ निर्धारीत करण्यात आली आहे.