शेतात लावली 13000 सागवानाची झाडे; 20 वर्षात शेतकरी बनला 100 कोटींचा मालक
Farmer Success Story: मध्य प्रदेशातील शेतकऱ्याने 20 एकर शेतीतून 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर आता इतर शेतकरीही त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत.
Farmer Success Story: शेतकरी हा आपल्या मेहनत, जिद्दीसाठी ओळखला जातो. ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करत तो शेती करतो. पीक घेतो आणि स्वत:सोबत इतरांचे पोट भरतो. त्यामुळे शेतकऱ्याची कहाणी नेहमीच प्रेरणादायी ठरते. मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यात एका शेतकऱ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. यामागचे कारणही तसेच आहे. या शेतकऱ्याने 20 एकर शेतीतून 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर आता इतर शेतकरीही त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत.
टिकमगड शहरातील रहिवासी शेतकरी अनिल बडकुल यांनी चमत्कार करुन दाखवला आहे. त्याचा चमत्कार पाहून लोक दातओठ चावू लागली आहेत. अनिल बडकुल यांना हे कसं शक्य झालं? अशी चर्चा ते करत आहेत. पण यामागे अनिल यांचे 20 वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आहे. त्यासाठी घेतलेली मेहनत आहे. अनिल यांनी आपल्या शेतीत पिकांसह सागवानाची झाडे लावायला सुरुवात केली. सुमारे 20 एकरांमध्ये सागवानाची रोपटी लावली गेली ज्याची आज किंमत 100 कोटींपेक्षा जास्त आहे. आता अनिल हे कोट्यधीश शेतकरी झाले आहेत.
अनिल यांनी 20 एकर जागेत 13000 सागवान झाडे लावली. ही सर्व झाडे 2003 ते 2013 या कालावधीत लावण्यात आली. या झाडांची किंमत 2023 मध्ये 100 कोटी रुपये सांगितली जात आहे. प्रगत शेतकरी होण्यासाठी पारंपरिक शेतीतून बाहेर पडावे लागेल. शेतीसोबत झाडे लावून प्रगत शेतकरी व्हावे लागेल. यानंतर शेतकरी संपत्तीच्या माध्यमातून समृद्धही होऊ शकतो, असे अनिल सांगतात.
बुंदेलखंडचे हवामानही सागवान वृक्षांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे फारसा खर्च येत नाही. रोप लावल्यानंतर त्याची काळजी घेणे आणि पाणी देणे या मुख्य गोष्टी आहेत. रोपाची फक्त 3 वर्षे काळजी घ्यावी लागते. यानंतर त्याला सतत पाणी द्यावे लागते.माझ्या 20 वर्षांच्या प्रयत्नांनी मातीत सोनं निर्माण झालं असल्याचे ते सांगतात.शेतकरी अनिल बडकुल यांनी नवभारत टाईम्स डॉट कॉमला याबद्दल माहिती दिली.
मी 30 वर्षांपासून शेती करत आहेत. सुरुवातीच्या 10 वर्षांनंतर आपण स्वतःचा नफा वाढला पाहिजे असा विचार माझ्या मनात आला. हे करताना पर्यावरणाचाही फायदा झाला पाहिजे. यानंतर मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली. त्यानंतर 2003 पासून मी झाडे लावायला सुरुवात केली. सागाची लागवड करण्यासाठी शेताला कुंपण घालावे लागल्याचे ते म्हणाले.
अनिल यांनी आता चंदनाच्या झाडांची लागवड सुरू केली आहे. मी बराच काळ शेती करत होतो, पण शेतीचा व्यवहार तोट्यात जात होता. 2003 साली सागवानाची झाडे का लावू नयेत असा विचार मनात आला आणि तो मी प्रत्यक्षात उतरवला. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी 2003 साली सागवानाची रोपे लावण्यास सुरुवात केल्याचे ते सांगतात.