मॅकडोनेल्समध्ये झाडू मारणारी महिला, आज आहे मोदी सरकारमधील सेलिब्रिटी मंत्री
सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून ते टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवण्यापर्यंत
Leaders : सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून ते टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवण्यापर्यंत, स्मृती इराणी यांनी अगदी लहान वयातच उत्तुंग यश मिळवले आणि 'तुलसी' म्हणून घराघरात ओळख मिळवत कॅबिनेट मंत्री पद ही आपल्या नावावर केलं. आज स्मृती इराणींनी ते सर्व साध्य केले आहे जे प्रत्येकाला जमत नाही.
मात्र, स्मृती इराणींचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्या 18-19 वर्षांची असताना त्यांना नोकरीसाठी खूप संघर्ष करावा लागला. दिसण्यावरुन ही त्यांना वाईट गोष्टी बोलल्या गेल्या. कुठेही कामाची चर्चा नसताना मॅकडोनेल्समध्ये झाडू मारण्याचं, लादी पुरण्याचं काम त्यांनी केलं. एवढंच नव्हे तर ट्रे धुण्याचं काम करन त्या पैसे कमवत होत्या.
स्मृति इराणाी यांच्याकडे नोकरी नव्हती. शेवटी फक्त 200 रुपये शिल्लक होते. स्मृति यांना त्यांच्या बहिणीने विचारलं, तू रोज इंटरव्ह्यू द्यायला जातेस, मग काय गडबड करतेस? आज मी तुझ्याबरोबर जाणार आहे. मी वर्तमानपत्रात दोन मुलाखती पाहिल्या - एक मॅकडोनेल्सची आणि एक जेट एअरवेजची.
त्या दिवसांत ती बारीक होती. जेट एअरवेजमध्ये नोकरी मिळाली तर भरपूर पैसे मिळतील, असे मला वाटले. किमान एक महिना चांगला जाईल. मी तिथे गेल्यावर लोक म्हणाले, 'तुझा चेहरा पाहिला का? ना दिसायला बरोबर ना तुमचं व्यक्तिमत्व जुळतं. आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही.'
स्वतःबद्दलच्या अशा गोष्टी ऐकून स्मृति यांना धक्काच बसला. स्मृती इराणींच्या धाकट्या बहिणीला तीच नोकरी मिळाली, ज्यासाठी त्यांना दिसायला खराब असल्यामुळे नाकारण्यात आलं. आणि याचं त्यांना आणखी विचित्र वाटलं.
स्मृती इराणी यांना त्यांची बहीण म्हणाली की, तुला जमत नसेल तर मला प्रयत्न करू दे. मी म्हणाले जा आणि करून बघ. मला वाटले की मला ते मिळाले नाही तर तिला ते का मिळेल? पण बहिणीला काम मिळाल्याचं कळलं. तेव्हा मला विचित्र वाटले की मी मोठी बहीण आहे. मला नोकरी मिळाली नाही, माझ्या धाकट्या बहिणीला मिळाली. मी माझ्या धाकट्या बहिणीच्या पगारावरच जगेन.
स्मृती इराणींनी पुन्हा विचार केला की, जेट एअरवेजची नोकरी मिळाली नाही तर काही हरकत नाही. त्यांनी मॅकडोनेल्समध्ये मुलाखत दिली तर काम होईल. इथेही दुर्दैव. तिथल्या नोकऱ्या आणि रिक्त जागा भरल्या गेल्या. फक्त एकच काम उरले होते, ट्रे आणि झाडू मारण्याचं आणि पुसण्याचं...
मॅकडोनाल्डची मुलाखत होती. मी तिथे गेले आणि म्हणाले, 'हे बघा, मी शिकलेली आहे. मी चांगले काम करू शकते.', तेव्हा ते लोक स्मृति यांना म्हणाले की, मॅडम तुम्ही उशीरा आलात. सर्व नोकऱ्या गेल्या आहेत, फक्त एक उरली आहे आणि ती तुमची किंमत नाही.'
तेव्हा स्मृति यांनी विचारलं काय काम आहे? ते म्हणाले की, फक्त झाडू मारण्याचे काम बाकी आहे. त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. स्मृति इराणी म्हणाल्या, "तुमच्याकडे असलेले काम मला द्या. माझा एवढा विश्वास आहे की एक दिवस मी तुमची ट्रे धुवून नक्कीच मॅनेजर होईन." त्यावेळी त्यांना 1800 रुपयांची नोकरी होती.
स्मृती इराणीच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आला जेव्हा त्यांनी मिस इंडिया 1998 च्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. त्यात त्या टॉप-9 मध्ये पोहोचू शकली नसल्या तरी लोकांच्या नजरेत त्या नक्कीच आल्या होत्या. यानंतर स्मृती यांनी मिका सिंगच्या म्युझिक व्हिडिओ 'बोलियां'मध्ये काम केलं आणि दबदबा निर्माण केला.
2000 मध्ये स्मृती इराणी यांनी काही टीव्ही शो केले आणि त्याच वर्षी एकताने त्यांना 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या शोमध्ये तुलसीच्या भूमिकेसाठी साईन केले. ही भूमिका साकारल्यानंतर स्मृती इराणीचे नशीब असे बदलले की दोन दशकांनंतरही लोक त्यांना खऱ्या आयुष्यात तुलसी म्हणूनच ओळखतात. या शोसाठी त्यांना ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ITA पुरस्कार मिळाला.
असे म्हटले जाते की, नंतर स्मृती इराणी यांचा एकता कपूरसोबत काही वाद झाला, ज्यामुळे स्मृती यांनी जून 2007 मध्ये 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मालिका सोडली. त्यानंतर तिच्या जागी एकताने गौतमी कपूरला तुलसीच्या भूमिकेसाठी साईन केले. मात्र, काही वर्षांनी एकता आणि स्मृती यांच्यातील मतभेद मिटले आणि दोघे अजूनही खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या.
टीव्ही करिअरला राम-राम ठोकल्यानंतर स्मृती इराणींनी नंतर राजकारणात प्रवेश केला. 2003 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमेठीतून निवडणूक लढवली आणि राहुल गांधींचा पराभव करून विजयी झाल्या. आज त्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मानव संसाधन विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी म्हणून कार्य़रत आहेत.