Success Story: आईने मजुरी करुन शिकवलं, मुलगी 22 व्या वर्षी IPS, 23 व्या वर्षी IAS
IAS Divya Tanwar Success Story: यूपीएससी एकदा उत्तीर्ण होणे हीच मोठी गोष्ट मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि समर्पण आवश्यक असते. आयएएस अधिकारी दिव्या तन्वर यांनी यूपीएससी दोनवेळा उत्तीर्ण होऊन ही किमया करुन दाखवली आहे.
IAS Divya Tanwar Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होण्याचे स्वप्न देशातील लाखो उमेदवार पाहत असतात. पण यातील काहीजणच उत्तीर्ण होतात. त्यातही नागरी सेवा परीक्षा दोनदा उत्तीर्ण होणे फार कठीण आहे. यूपीएससी एकदा उत्तीर्ण होणे हीच मोठी गोष्ट मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि समर्पण आवश्यक असते. आयएएस अधिकारी दिव्या तन्वर यांनी यूपीएससी दोनवेळा उत्तीर्ण होऊन ही किमया करुन दाखवली आहे.
दिव्या तन्वर 2021 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेला बसली आणि तिच्या पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया 438 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाली. परीक्षा उत्तीर्ण झाली तेव्हा दिव्या फक्त 21 वर्षांची होती. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय तिने सेल्फ स्टडीच्या जोरावर तिने परीक्षा उत्तीर्ण केली होती. यानंतर, तिने पुन्हा 2022 मध्ये यूपीएससी सीएसईसाठी वयाच्या 22 व्या वर्षी परीक्षा दिली. त्या परीक्षेतही ऑल इंडिया 105 वा क्रमांक मिळवून दिव्याने यश मिळविले.
आयएएस दिव्या तन्वर नेहमीच गुणवान विद्यार्थिनी होत्या. दिव्या या मूळच्या महेंद्रगडच्या असून त्यांचे शालेय शिक्षण गावातील सरकारी शाळेत झाले. नंतर महेंद्रगड येथील नवोदय विद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. दिव्याने विज्ञान शाखेत पदवी घेतली असून पदवीनंतर लगेचच यूपीएससीची तयारी सुरू केली.
परीक्षेच्या तयारीच्या वेळी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. पण तरीही दिव्या यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई खंबीरपणे उभी राहिली. आईने दिव्याला सर्व प्रकारे साथ दिली. दिव्याची आई बबिता यांनी एकट्याने तिन्ही भावंडांचा सांभाळ केला.
आयएएस दिव्या तन्वर देखील सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे त्या आपल्या फॉलोअर्स आणि मित्रासाठी प्रेरणादायी पोस्ट शेअर करत असतात. सध्या आयएएस दिव्या यांचे इन्स्टाग्रामवर ९० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.