Success Story: मेहनत घेण्याची तयारी, जिद्द, चिकाटी असेल तर यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. स्वत:वर मेहनत घेणारेच पुढच्या पिढीसाठी उदाहरण बनतात. चिनू काला यातीलच एक उदाहरण आहे. 
चिनूने वयाच्या 15 व्या वर्षी केवळ 300 रुपये हातात घेऊन घर सोडले होते. तिला सेल्सगर्लची नोकरी मिळाली आणि तिने घरोघरी चाकू-सुरे विकायला सुरुवात केली. त्यामुळे तिला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आधार मिळाला.पण हेच आयुष्य नाही तिला कळून चुकले होते. तिने संघर्ष केला. मेहनत घेतली. आज अब्जाधिशांमध्ये तिचे नाव घेतले जाते. तिच्या यशाची कहाणी सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिअरच्या सुरुवातील चाकू-सुरे विकण्याचे काम मिळाले नसते तर माझ्याकडे रोजचे अन्न खाण्यासाठीही पैसे नव्हते, असे चिनू सांगते. यातून तिचा संघर्ष आपल्याला कळू शकतो. लोकांच्या मागण्या समजून घेणे आणि त्या पूर्ण करणे  व्यवसायातील मुख्य काम आहे. करायला घेतले तर हे फारसे कठीण कामही नाही. पण चिनू कालाने मार्केटचा अभ्यास केला. 2004 मध्ये चिनुचे लग्न झाले. यानंतर तिने मिसेस इंडियामध्ये भाग घेतला आणि त्यात ती दुसरी आली. तिचा पहिला क्रमांक हुकला पण तिला दागिन्यांचे महत्त्व कळले.


व्यवसायाविषयीची समज आणि बाजारपेठेतील दागिन्यांचे महत्त्व यांची सांगड घालून चिनू कालाने ज्वेलरी ब्रँड सुरू केला.  रुबेन्स अ‍ॅक्सेसरीज असे या ब्रॅण्डचे नाव ठेवले. ज्वेलरी ब्रँड सुरू करण्याचा विचार तिच्या मनात अनेक वर्षांपासून होता, ज्याला तिने 2014 मध्ये आकार दिला. 


प्रत्येक व्यवसायाप्रमाणे तिला सुरुवातीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तिला मॉलमध्ये जागा मिळत नव्हती. त्यासाठी तिला 3 वर्षांची वाट पाहावी लागणार होती. दुकानासाठी तिच्याकडे मोठी रक्कम मागितली. चिनूने कसे तरी मॉल मालकांना समजावून सांगितले. यानंतर स्टोअर सुरू झाल्यानंतर तिला डिपॉझिट क्लिअर करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मिळाला.


स्टोअर उघडताच तिच्या ब्रँडने प्रचंड विक्री केली. पुढच्या महिन्याभरात विक्री इतकी झाली की जमा पैसे सहज दिले गेले. यानंतर चिनूने मागे वळून पाहिले नाही. आज तिच्या कंपनीचे मूल्य 1 अब्ज रुपयांच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. आज स्टोअर्स व्यतिरिक्त तिची उत्पादने Flipkart आणि Myntra सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत.मेहनत घेणाऱ्यांची कधी हार होत नाही, हे चिनू कालाच्या उदाहरणातून दिसून येते.