ग्वालियर :  ग्वालियरमध्ये राहणारे मनोहर मंडेलिया गेल्या १८ वर्षांपासून एका पेट्रोल पंपावर काम करीत आहे. पण त्यांनी आपल्या मुलाला खूप शिकवलं, त्याला IIM शिलाँगमध्ये शिक्षण दिले. आता कर्मधर्म संयोगाने त्यांचा मुलगा मोहित पेट्रोलियम कंपनीतील ऑफिसर बनला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑफीसर झालेल्या मोहित मंडेलिया याला वर्षाला २१.४ लाखांचा रग्गड पगार मिळाला आहे. मोहितने सांगितले की माझ्या वडिलांना जीवनात खूप काही करायचे होते पण आर्थिक परिस्थितीमुळे ते काहीच करू शकले नाही. त्यांनी बी.कॉम करूनही पेट्रोल पंपावर नोकरी केली. 


माझ्या वडिलांचा संघर्ष पाहून मी खूप अभ्यास केला आणि शाळेपासून आयआयएमचे शिक्षण स्कॉरलशीपवर केले. 


आता शिलाँगमध्ये कॅम्पस सिलेक्शनमध्ये एक पेट्रोलियमम कंपनीत सेल्स ऑफीसर म्हणून मोहितचे सिलेक्शन झाले आहे.