Narendra Modi On Chandrayaan 3 Launch: देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमपैकी एक असलेल्या चांद्रयान-3 यशस्वीरित्या (Chandrayaan 3) लॉन्च करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन (Satish Dhawan Space Center) हे 2 वाजून 35 मिनिटांनी प्रेक्षपण करण्यात आलंय. हे यान अवकाशात झेपवताच भारताच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. चंद्रयान दोनच्या सश्रिम कामगिरीनंतर आता चंद्रयान 3  ने यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेने उड्डान केलंय. अशातच आता पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) देखील ट्विट करत इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक केलंय.


पाहा ट्विट 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांद्रयान-3 भारताच्या अंतराळ ओडिसीमध्ये एक नवीन अध्याय लिहित आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत, उंच भरारी घेत आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या जिद्द आणि चातुर्याला माझा सलाम, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.



इस्रोच्या वैज्ञानिकांना चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणाचा आनंद अनावर झाला. वैज्ञानिकांना बोलायला शब्दही सुचेना झाले. देवेंद्र फडणवीसांनी व्हिडीओ शेअर केला आहे. चांद्रयान-३ मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 


पाहा video



दरम्यान, इस्रोच्या प्रक्षेपकाने रॉकेटने म्हणजेच LMV 3 ने कामगिरी चोख बजावली, पृथ्वीभोवतीच्या कक्षेत चांद्रयान 3 पोहचलं. त्यानंतर आता चांद्रयान 3 नं चंद्राच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू केला आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या भ्रमणकक्षेत दाखल होईल.