अग्नि-५ मिसाईलचं यशस्वी परीक्षण, पाकिस्तान-चीनला करु शकतो उद्धवस्त
भारताने गुरुवारी मोठं यश मिळवलं आहे. भारताने आपल्या अणू क्षमता असलेल्या मिसाईलचं यशस्वीरित्या परीक्षण केलं.
नवी दिल्ली : भारताने गुरुवारी मोठं यश मिळवलं आहे. भारताने आपल्या अणू क्षमता असलेल्या मिसाईलचं यशस्वीरित्या परीक्षण केलं.
लांबच्या ठिकाणाला लक्ष्य
अग्नि-5 असं या मिसाईलचं नाव आहे. ही एक अंतर-महाद्विप बॅलिस्टिक मिसाईल आहे. भारतामध्ये विकसित अग्नि-5 ही 5000 किलोमीटरहून अधिक लाबं असलेल्या ठिकाणाला लक्ष्य करु शकतात.
हत्यारं घेऊन जाण्याची क्षमता
अग्नि 5 ही अनेक हत्यारं घेऊन जाण्याची क्षमता ठेवते. परमाणु क्षमता असलेल्या या मिसाईलच्या रेंजमध्ये संपूर्ण पाकिस्तान आणि चीन देखील येऊ शकतो.
कधी-कधी झालं परीक्षण
याचं पहिलं परीक्षण १९ एप्रिल २०१२ ला करण्यात आलं होतं. तर दूसरं परीक्षण १५ सप्टेंबर ३०१३ ला करण्यात आलं होतं. तिसरं परीक्षण ३१ डिसेंबर २०१५ ला झालं होतं.