नोएडा : लग्न म्हटलं की तयारी, गडबड, नातेवाईक अनेक गोष्टींनी घर भरलेलं असतं. सध्या लग्न सराई सुरू आहे. सगळीकडे  नातेवाईकांच्या  किंवा मित्रमंडळींच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.  अशात अनेक धक्कादायक घटना ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. कधी नवरा मुलगा भरमंडपातून पळून जातो, तर कधी अर्ध्या विधी पूर्ण झाल्यानंतर नवरी लग्नास नकार देते. पण आता एक वेगळी घटना समोर येत आहे. मोठ्या उत्साहात लग्नाच्या विधी सुरू असतात. भर मंडपात पोलिसांची एन्ट्री होते. पोलीस नवरीला एक प्रश्न विचारतात आणि पोलिसांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळताचं रंगलेलं लग्न थांबतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमची सहयोगी वेबसाईट इंडिया डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री  पोर्टलवर एका अज्ञात इसमाने तक्रार केल्यानंतर  पोलीस विवाह मंडपात पोहोचले. त्या अज्ञात इसमाने सांगितलं की,  दोन मुलं आणि दोन मुलींचं लग्न सुरू होतं. हे  चारही मुलं एकत्र शिक्षण घेत होते. ही बातमी कळताच पोलीस आणि चाइल्ड हेल्पलाईनचे लोक शक्य तितक्या लवकर घटनास्थळी पोहोचले.


पोलिसांना पाहाताचं लग्न मंडपात एकच खळबळ माजली. दरम्यान पोलिसांनी नवरा आणि नवरीला त्यांचं वय विचारलं. चारही मुलांचे वय जवळपास 14 वर्ष असेल. ग्रेटर नोएडा प्रोबेशन ऑफिसर यांनी सांगितले, 'चारही मुलांची विचारपूस केली असता. त्यांच्या वयाबद्दल माहिती मिळाली शिवाय पोलिसांनी कागदपत्र देखील घेतली आहेत. 


ज्यावरून हे स्पष्ट झाले की हे चारही विद्यार्थी अजूनही अल्पवयीन आहेत. यानंतर टीमने हे लग्न थांबवले.' अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश कुमार सिंह यांनी अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना असे निर्देश दिले आहेत की जर त्यांनी भविष्यात असे कृत्य केले तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.