सरकारच्या या योजनेसाठी लोगो-टॅग लाईन सुचवा आणि जिंका 1 लाखांचं बक्षीस
MyGov वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही लोगो आणि टॅगलाईन सबमिट करु शकता.
नवी दिल्ली : जर तुमच्याकडे क्रिएटीव्हीटी आहे तर तुम्ही एक लाख रुपये जिंकू शकता. केंद्र सरकारने एका योजनेसाठी लोगो डिझाईन करायची आहे. जर तुमचा लोगो सरकारला आवडला तर तुम्हाला एक लाखांचं बक्षिस मिळू शकतं.
महिला आणि बाल कल्याण मंत्रालयने MyGov सोबत एक लोगो डिझाईन करण्यासाठी बक्षिस ठेवलं आहे. लोगोसह मिशन पोषण 2.0 लॉन्च करण्य़ासाठी एक टॅगलाईन देखील सुचवायची आहे.
MyGov वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही लोगो आणि टॅगलाईन सबमिट करु शकता. जिंकणाऱ्या व्यक्तीला 1 लाखाचं रोख बक्षिस दिलं जाणार आहे.
कोण घेऊ शकतं भाग?
हा लोगो डिझाईन करण्यासाठी भारतीय नागरिकच भाग घेऊ शकणार आहेत. दुसऱ्या देशातील नागरिकांना यामध्ये सहऊागी होता येणार नाही. लोगो आणि टॅगलाईन ओरिजनल असावी. इंडियन कॉपीराईट एक्ट, 1957 नुसार उल्लंघन होता कामा नये.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी MyGov प्लेटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. या शिवाय ईमेल करण्यासाठी cpmu.poshan.mwcd@gmail.com. यावर तुम्ही पाठवू शकता.
भाग घेणाऱ्या व्यक्तीचं MyGov वरील प्रोफाईल योग्य आणि अपडेट असायला हवं. तुमचं नाम, ईमेल आयडी, फोटो आणि मोबाईल नंबर तुम्हाला पाठवायचा आहे.
लोगो आणि टॅगलाईन जर निवडली गेली तर ती महिला व बाल कल्याण मंत्रालयाची प्रॉपर्टी राहिल. विजेता त्यावर नंतर हक्क सांगू शकणार नाही. एक व्यक्ती फक्त एकच एंट्री करु शकतो. टॅगलाइन हिंदी आणि इंग्रजी मध्ये असावी.