काबुल : अफगानिस्तानची राजधानी काबुलमधील क्रिकेट स्टेडियमजवळ बुधवारी आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह इतर ३ जणांचा मृत्यू झाला. तर, पाच जण जखमी झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार हल्लेखोर स्टेडियमच्या दिशेने जात होता. मात्र, त्याला रोखण्यात येताच त्याने स्वत:ला उडवून दिले. पोलीस प्रवक्ते बसीर मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षारक्षकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हल्लेखोराला स्टेडियमजवळ जाण्यापासून रोखले. त्याला रोखले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.


अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रवाक्ता फरीद होटक यांनी सांगितले की, हा हल्ला झाला तेव्हा स्टेडियममध्ये क्रिकेट सामना सुरु होता. खेळाडूंसह सर्व बोर्ड पदाधिकारी सुरक्षीत असल्याची माहितीही होटक यांनी दिली.