Sukanya Samriddhi Yojana: देशात स्त्रियांचा जन्मदर वाढावा यासाठी भारत सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. मुलींच्या शिक्षणापासून ते तिचे लग्न होईपर्यंत पालकांना सतत तिच्या भविष्याबाबत चिंता सतावत असते. अनेकदा याच कारणांमुळं भ्रुणहत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असते. किंवा मुलगी झाली तर तिचे शिक्षण थांबवले जाते. या सगळ्या कारणांचा विचार करुन सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक योजना राबवली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास मुलीच्या शिक्षणाबरोबरच लग्नाच्या खर्चांसाठीही पैशाचा योग्य ताळमेळ तुम्ही बसवू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालक म्हणून तुम्ही नेहमीच आपल्या मुलांसाठी योग्य निर्णय घेतात. तुमच्या मुलांच्या पुढील भवितव्यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणुक करत असतात. सरकारने देखील मुलींच्या पालकांसाठी एक योजना आणली आहे. सुकन्या समृद्धी योजना असं तिचं नाव आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचे टेन्शन राहणार नाही.


समोशांबाबत मिळाली सिक्रेट टिप, पोलिसांनी सापळा रचला, धाड टाकताच सापडलं...


८ टक्के व्याज


एप्रिल ते जून २०२३ साठी सुकन्या समृद्धी योजनेसाठी नवीन व्याज दर ८ टक्के आहे. समृद्धी योजनेसाठी दर तीन महिन्यांनी व्याज दर निश्चित होत असतात. 


वयाच्या कितव्या वर्षी खाते सुरू कराल


मुलीचे वय दहा वर्ष पूर्ण होण्याच्याआधी सुकन्या समृद्धी योजनेत खाते सुरू करु शकता. मुलीच्या जन्मानंतर लगेचही काही पालक एसएसवाय अकाउंट (SSY Account) सुरू करु शकतात. यात १५ वर्षांपर्यंत पालक रक्कम जमा करु शकतात. एकदा का मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाले की मॅच्युरिटीच्या रकमेच्या ५० टक्के हिस्सा तुम्ही काढू शकता. तर, उर्वरित रक्कम मुलीचे वय २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर काढू शकता. 


मध्यरात्री तिघे गावात घुसले, गावकऱ्यांनी चोर समजून केलेल्या मारहाणीत एक ठार, नंतर वेगळेच सत्य समोर 


लग्नाच्या वयापर्यंत मिळतील ६४ टक्के


सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 12, 500 रुपये जमा करत असाल तर एका वर्षात ही रक्कम 1.5 लाख इतकी होईल. या पैशांवर कोणताही कर आकारला जाणार नाही. जर आपण मॅच्युरिटीपर्यंत रकमेवर 7.6 टक्के व्याज पकडले तर गुंतवणुकदार मुलीसाठी मोठी रक्कम उभी करु शकतील. पालक मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खाते बंद करु इच्छितात तर त्यांना म्यॅच्युरिटीपर्यंत एकूण 63 लाख 79 हजार 634 रुपये मिळू शकतात. या रकमेत, पालकांनी गुंतवलेली रक्कम रु. 22,50,000 असेल. याशिवाय व्याजाचे उत्पन्न 41,29,634 रुपये असेल. अशाप्रकारे सुकन्या समृद्धी अकाउंटमध्ये दर महिन्याला १२,५०० रुपये जमा केल्यास मुलीचे वय २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जवळपास ६४ लाखा इतकी रक्कम मिळणार आहे. 


कर सवलत मिळणार


सुकन्या समृद्धी योजनेत एका वर्षात 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास कर सलवतीचा फायदा मिळू शकतो. SSYमध्ये एक वर्षांपर्यंत जास्तीत जास्त १.५ लाख डिपॉझिट करु शकतो. यात तीन ठिकाणी करात सवलत मिळू शकते. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेली रक्कम, व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळालेली रक्कम हे तिन्ही टॅक्स फ्री असतात.