समोशांबाबत मिळाली सिक्रेट टिप, पोलिसांनी सापळा रचला, धाड टाकताच सापडलं...

Selling Beef Samosa In Gujarat: सुरतमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत समोशांमध्ये गोमांस टाकून विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Updated: May 27, 2023, 04:42 PM IST
समोशांबाबत मिळाली सिक्रेट टिप, पोलिसांनी सापळा रचला, धाड टाकताच सापडलं...  title=
surat man sells samosa stuffed with beef slaughter arrested

Man Sells Samosa Stuffed With Beef : घरात पाहुणे आलेले असो किंवा संध्याकाळचा नाष्टा असो भारतीयांचा पहिली पसंत म्हणजे समोसा (Samosa). समोसा हा खवय्यांचा विक पॉइंट आहे. मात्र, गुजरातमध्ये (Gujrat) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समोशांमध्ये गोमांस (Beef) वापरणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या सिक्रेट टिपच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली आहे. तर, जप्त करण्यात आलेले समोसे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर या कारवाईला दुजोरा मिळाला आहे. पोलिसांनी गोहत्या आणि गोमांस विक्रीच्या आरोपाखाली दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ( Selling Beef Samosa In Gujarat)

४८ समोसे केले जप्त

सुरतच्या कोसाडी गावात इस्माइल युसूफचे समोशाचे दुकान आहे. पोलिसांनी इस्माइलबाबत एक सिक्रेट टिप मिळाली होती. इस्माइलच्या समोशांमध्ये गोमांस असते. तसंच, आज तो बीफ असलेले समोसे घेऊन मोसाली चार रस्त्यावरुन जाणार आहे, अशी गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. पोलिसांनी तो जात असलेली रिक्षा थांबवली व झडती घेतली. त्यात इस्माइल बसलेला होता व त्याच्याकडे ४८ समोसे होते. पोलिसांनी हे सर्व समोसे जप्त केले.

पत्नीच्या प्रियकराला जेवायला बोलवलं, रात्री बाजूलाच झोपवलं, अन् सकाळी घडला एकच थरार

नदी किनारी गोहत्या

पोलिसांनी इस्माइलला ताब्यात घेतलं आहे. यावेळी चौकशीदरम्यान त्याने कबुल केले आहे की तो सुलेमान उर्फ सल्लू आणि नागीन वसावा यांच्याकडून बीफची खरेदी करत होता. त्यानंतर तो समोसे बनवून विकत होता. इतकंच, नव्हे तर त्यांने पोलिसांना आणखी एक महत्त्वपूर्ण माहितीदेखील पुरवली आहे. सुलेमान आणि नगीन कोसडी गावाच्या नदी किनारी गोहत्या करतात. 

समोसे जप्त करण्यात आले

इस्माइल ने तयार केलेले समोसे पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यानंतर ते प्रयोगशाळेत एफएसएल चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. एफएसएल अधिकाऱ्यांनीही या समोशांमध्ये गोमांस असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

मोठी बातमी! दादर स्थानकात होणार मोठा बदल, प्रवाशांचा गोंधळ थांबणार

गुन्हा दाखल 

पोलिसांनी इस्माइलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच, पुढील चौकशी करत आहेत. आरोपी इस्माइलला याआधी पण गोमांसची विक्री करताना पकडण्यात आले होते. आता त्याचा पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या आम्ही त्याची चौकशी करत असून त्याच्याकडून जी माहिती मिळत आहे त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस नायब अधीक्षक बी के वनार यांनी दिली आहे.