जम्मू : श्रीनगरच्या सीआरपीएफच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यानंतर लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी जवानांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काल रात्रभर दोन्ही बाजूंनी होणारा गोळीबार थंडावला होता. 


दहशतवाद्यांचा शोध सुरू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पहाटे सीआरपीएफच्या जवानांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा शोध सुरू केलाय. श्रीनगर शहरातल्या करणनगरमध्ये असणाऱ्या सीआरपीएफच्या छावणीवर सोमवारी पहाटे साडेचार वाजता दहशतवादी हल्ला झाला. 


गोळीबार करून छावणीतून पळ


दहशतवाद्यांनी गोळीबार करून छावणीतून पळ काढला आणि जवळच्याच एका रहिवाशी इमारतीत लपून बसले. काल दुपारपासून करणनगरमधल्याच या इमारतीत सीआरपीएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. त्यात एक जवान शहीद झाला असून एक पोलीस कर्मचारी जखमी आहे.