1st Sunrise In India: 31 डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस. अनेक जण सरत्या वर्षाला निरोप देताना सूर्यास्त आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. सर्वसाधारणपणे सूर्यास्त हा सायंकाळी सहाच्या दरम्यान होतो. मात्र, भारतात एक गाव असे आहे जिथे दुपारी चार वाजताच Sunset होतो. तर, या गावात पहाटे 3 वाजताच सूर्य उगवतो. अरुणाचल प्रदेश हे भारतात सर्वात प्रथम सूर्योदय होणारे राज्य आहे. भारतात सूर्याची पहिली किरण ज्या गावावर पडतात ते पहिले गाव देखील अरुणाचल प्रदेशमध्येच आहे(Dong Valley – The Land of India’s First Sunlight).  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गावाचे नाव डोंग असे आहे. हे गाव अतिशय छोटं आणि फारच सुंदर आहे. भारत- चीन- म्यानमार ट्राय जंक्शनवर डोंग हे पिटुकले गाव वसलेले आहे. पृवोत्तर सीमेवरचे भारत हद्दीतले हे पहिले गाव आहे. 
अंदमानच्या कटचल टापूवर सूर्याची पहिली किरणे पडतात असा दावा केला जात होता. मात्र,  डोंग हे भारतावर सर्वप्रथम सूर्यकिरणे पडणारे गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. 1999 पासून हे गाव पर्यटकांच्या नकाशावर आले. देश विदेशातून अनेक पर्यटक आवर्जून येथील  सूर्योदय पाहायला येतात.


डोंग हे गाव समुद्रसपाटीपासून 1240 मीटर उंचीवर


भारतातील बहुतेक भागात साधारण सकाळी सहाच्या दरम्यान सुर्योदय होता. मात्र, पहाटे तीन वाजता  जेव्हा सर्व जण गाढ झोपेत असतात तेव्हा डोंग गावच्या डोंगर कपारीतून उगवणारी सूर्यकिरणे अलगद संपूर्ण परिसरावर सोनेरी रंगाची उधळण करतात. पहाटे चार वाजता येथे स्वच्छ उजाडलेले असते. पहाटे चार वाजताच येथील लोकांचा दिनक्रम सुरु होतो आणि ते आपल्या रोजच्या कामाला लागलेले असतात. येथे 12 तासांचा दिवस असतो. 
सूर्योदय पहाटे तीनला होत असल्याने येथे सूर्योदय देखील दुपारी तीन वाजताच होतो. इतर ठिकाणी  दुपारी चारच्या सुमारास चहा पाणी घेण्याच्या तयारीत असतो तेव्हा हे चिमुकले गाव रात्रीच्या गडद अंधारात झोपण्याच्या तयारीत असते. समुद्रसपाटीपासून 1240 मीटर उंचीवर असलेले हे गाव लोहित आणि सती नदीच्या संगमावर बसलेले आहे.


या गावाची लोकसंख्या फक्त 35


या गावाचा लोकसख्यंच्या बाबतीत देखील अनोखा विक्रम आहे.  अतिशय निसर्गसुंदर अशा या गावात जवळपास फक्त 35 लोक राहतात. शेती हाच येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय आहे. या गावात पर्यटकांना राहण्यासाठी अजून पुरेश्या सुविधा देखील नाहीत.  पाटबंधारे विभागामार्फत शेजारच्या वालोंग गावात पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा दिली आहे. वालोंग येथेच 1962 चे भारत चीन युद्ध झाले होते. या ठिकाणी सैन्याचा मोठा तळ देखील आहे. डोंग येथील सूर्योदय पाहण्यासाठी येथून 8 किमीचा ट्रेक करून जावे लागते.