Chandrayaan 3 News : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला टप्पा यशस्वपीरीत्या पार पडल्यानंतर आता सगळेजण वाट पाहत आहेत ती 22 सप्टेंबर या तारखेची. चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर सूर्योदय होत आहे. चंद्रावर दिवस उजाडेल तेव्हा स्लीप मोडवर असलेले  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टीव्ह होतील का?  याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इस्रोची टीम यासाठी सज्ज झाली आहे. 


चांद्रयान 3 मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर 2 वाजून 35 मिनिटांनी रॉकेट चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. यानंतर 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान 3 चंद्रावर लँड झाले. यावेळेस चंद्रावर सूर्योदय होत होता. तब्बल 14 दिवस चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांनी यशस्वीरित्या संशोधन केले. चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे देखील या संशोधनादरम्यान सापडली आहेत. 


4 सप्टेंबरला  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर गेले


चंद्रावर पृथ्वीवरील 14 दिवसांचा एक दिवस असतो तर, रात्र देखील 14 दिवसांची असते. येथील दिवस आणि रात्रीच्या तापमानात खूप फरक आहे. दिवसा 120 अंश सेल्सियस इतके तापमान असते तर उणे 150 असे तापमान असते. चंद्रावर दिवस असताना 14 दिवस  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांनी संशोधन केले. 4  सप्टेंबरला  विक्रम लँडरने  हॉप एक्सपेरीमेंट म्हणजे उडी मारण्याचा प्रयोग यशस्वी केला. कमांड मिळाल्यानंतर विक्रम लँडरने त्याचं इंजिन सुरु केलं. त्यानंतर विक्रम लँडरने 40 सेंटीमीटरची उडी घेतली. यानंतर विक्रम लँडरला स्लीम मोडची कमांड देण्यात आली. विक्रम लँडर स्लीपमोडवर जाण्याआधी काही तास आधीच प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर गेला होता. 


विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे रिसीव्हर ऑन


चांद्रयान 3 मोहिमेवर काम करणारी इस्रोची टीम दुसऱ्या टप्प्याची तयारी करत आहे. चंद्रावर नवा सूर्योदय होत आहे. लवकरच चंद्रावर लख्ख सूर्य प्रकाश पडणार आहे. सूर्याच्या उगवत्या किरणाकडे आशेचा किरण म्हणून पाहिले जात आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे रिसीव्हर ऑन ठेवण्यात आले आहेत. सूर्यप्रकाशात  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या बॅटरी सोलर पॅनलच्या चार्ज केल्या जाणार आहेत. यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टीव्ह झाले तर या मोहिमेतील मोठे यश असणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टीव्ह झाले तर पुन्हा संशोधन केले जाणार आहे. मात्र,  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टीव्ह झाले नाहीत तर ते चंद्राच्या पृष्ठभागावर तसेच पडून राहतील.