चेन्नई : Loksabha elections 2019 अभिनय विश्वाकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेता रजनीकांत यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात रजनीकांत आणि त्यांचा पक्ष रजनी मक्कल मंदारम उतरणार का, या प्रश्नाने सर्वांच्याच मनात घत केलं होतं. पण, आपण २०१९ मधील लोकसभा निवडणुका लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याऐवजी तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांवर आमचं लक्ष असेल हा महत्त्वाचा निर्णय त्यांनी जाहीर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकांमध्ये आपण कोणत्याही पक्षा पाठिंबा देणार नसल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळे रजनीकांत यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी होणाऱ्या चर्चांना आता पूरविराम मिळाला आहे. त्याशिवाय चाहते आणि कार्यतर्त्यांनी आपल्या राजकीय पक्षाचं चिन्हं, झेंडा, फलक अशा कोणत्याही वस्तूचा वापर हा इतर पक्षाच्या प्रचारासाठी न करण्याता सल्लाही त्यांनी दिला. 


तामिळनाडूचा पाणी प्रश्न महत्त्वाचा 


आपल्या क्षेत्रातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर रजनीकांत आणि त्यांचा पक्ष प्रधान्य देत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.  जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत पत्रकामध्ये याविषयीचा उल्लेख करण्यात आला आहे. आपल्या पक्षासाठी त्यांनी जनतेला मतं देण्याची विनंती केली असून, एका मताने निर्णायक बहुमत सिद्ध करता येतं ही बाब अधोरेखित केली. तामिळनाडूच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं त्यांच्याक़डून सांगण्यात आलं.


काही दिवसांपासून रजनीकांत आणि त्यांच्या राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं होतं. पक्षाचं नाव त्याचं चिन्हं असणाऱ्या एका वृत्तवाहिनीसाठीच्या कागदोपत्री व्यवहाराची चर्चा सुरू होती. ज्यामुळेच ते आगामी निवडणुकांमध्ये उभे राहणार असल्याचंही म्हटलं जात होतं. पण, आता मात्र चित्र स्पष्ट झालं असून, रजनी समर्थकांमध्ये मात्र निराशेचं वातावरण पाहायला मिळत आहे.