Noida Supertech Twin Towers Demolition:  उत्तर प्रदेशमधील नोएडा (Noida) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले  ट्वीन्स टॉवर (Supertech Twin Towers) अखेर पाडण्यात आले आहे. अवघ्या 9 सेकंदात देशातील सर्वात उंच उमारत जमीनदोस्त झाली आहे. ही इमारत पाडण्यासाठी 3 हजार 700 किलो वजनाच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्वीन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. ही इमारत पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत होती. अखेरी ही इमारत पाडण्यात आली आहे. या घटनेचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बांधकाम पाडण्यासाठी 3500 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे. जवळपासचे निवासी भाग रिकामे करण्यात आले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस, सुरक्षा कर्मचारी, बचाव पथक, अग्निपथक तैनात करण्यात आले आहे.



एमराल्ड कोर्ट आणि एटीएस व्हिलेज सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुमारे 5 हजार लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. नोएडा प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, इमारत पाडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात धुळीचा सामना करण्यासाठी 100 पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. 15 अँटी स्मॉग गन, 6 मेकॅनिकल स्वीपिंग मशीन, सुमारे 200 सफाई कामगार आणि 20 ट्रॅक्टर ट्रॉली लावण्यात आल्या आहेत. याशिवाय 100 हून अधिक अग्निशमन बंबही सज्ज ठेवण्यात आले आहेत. 



टॉवर पाडण्याची तारीख 22 मे 2022 निश्चित करण्यात आली होती, परंतु तयारी पूर्ण झाली नसल्याचे नमूद करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणांना वेळ दिला. यानंतर 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान टॉवर तोडण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, यावेळीही टॉवर पाडण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती, मात्र संबंधित यंत्रणेने प्राधिकरणाला पत्र देऊन ट्विन टॉवर कमकुवत झाल्यामुळे धोक्याची भीती व्यक्त करत 28 तारखेपर्यंत इमारत पाडण्याची सूचना केली होती. त्यानुसार अखेर सुपरटेक ट्विन टॉवर आज पाडण्यात आला.