नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनिल देशमुखांना मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणीची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय बाद ठरवण्याची मागणी देशमुख यांनी या याचिकेद्वारे केली होती. (Supreme Court dismisses a plea of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh challenging a Bombay High Court order refusing to quash the CBI FIR against him in a corruption case)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं? 


"मुंबई हायकोर्टाचा निर्णय योग्यच आहे" असं या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायलयाने म्हटलं. अनिल देशमुखांनी सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायलयाने नकार दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र आता ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता देशमुखांचं पुढचं पाऊल काय असणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.